हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटीचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी 2 महिन्यापासून संप पुकारला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचे विलीनीकरण शक्य नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा विषय डोक्यातून काढून टाकावा असा स्पष्ट सल्ला दिला. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांनी पवार घराण्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. मी आधीपासूनच सांगत होतो की पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका असे पडळकर यांनी म्हंटल.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयातून यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला. अजित पवार यांना विलीनीकरण शक्य नाही हे माहीत होते तर राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात का उल्लेख केला होता? एसटी कर्मचारी 50 वर्ष ज्यांच्या पाठीमागे कर्मचारी राहिले त्यांनी आज कर्मचाऱ्यांचा घात केला, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केला आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले-
एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही त्यामुळे विलीनीकरणचा विषय डोक्यातून काढून टाका. कुणाचेही सरकार असले तरी त्या सरकारला हे शक्य नाही असे स्पष्ट मत अजित पवारांनी मांडलं. आज एका महामंडळाचं विलिनीकरण केलं तर उद्या अनेक महामंडळाकडून विलिनीकरणाची मागणी पुढे येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली