हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे. अशात कर्मचाऱ्यांना बडतर्फही केले जात आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. “एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारकडून कट रचला जात असल्याचा आरोप पडळकरांनी केला. तसेच यातून जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचे आणि नव्या भरतीतून टक्केवारी वसूल करण्याचा प्लॅन या सरकारचा दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली.
गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा कशा प्रकारे चिघळेल, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यभर गेल्या अनेक दिवसापासून संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर रूजू व्हा, असे म्हणायचे. आणि ते जेव्हा हजर होण्यासाठी गेले असता त्यांच्या हातात बडतर्फ करण्यात आल्याच्या नोटीसा द्यायच्या, असा पद्धतशीरपणे कट या सरकारकडून रचला जात आहे.
#एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारचा कट आहे.कर्मचाऱ्यांना रूजू व्हा म्हणायचं आणि हातात नोटीसा द्यायच्या.जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचे आणि नव्या भरतीतून टक्केवारी वसूल करण्याचा प्लॅन या सरकारचा दिसतोय.@advanilparab @msrtcofficial @BJP4Maharashtra pic.twitter.com/hOkNlwIuAq
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) February 11, 2022
यावेळी पडळकरांनी महाविकास आघाडी सरकावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचे आणि नव्या भरतीतून टक्केवारी वसूल करण्याचा प्लॅन या सरकारकडून केला जात असल्याचे दिसत आहे, असे पडळकर यांनी म्हंटले.