काळ्या पैशाविरोधात सरकारची मोठी कारवाई, आता तुम्हीही अशाप्रकारे नोंदवू शकाल तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काळा पैसा (Black money), बेनामी प्रॉपर्टी असणारे आणि कर (Tax) चुकवणाऱ्यांविरूद्ध केंद्र सरकार काय आणि कशी कारवाई करीत आहे, हे आपण आता पाहू शकता. अशा लोकांविरूद्ध आपण केलेल्या तक्रारीवरून आपण वेळोवेळी ही कारवाई तपासू शकता. यासाठी केंद्र सरकार (Central government ) ने एक ई-फाइलिंग पोर्टल सुरू केले आहे. एका खास क्रमांकाच्या मदतीने आपण आपल्या तक्रारीची स्थिती पाहू शकता.

https://t.co/lJ1CSk1tuK?amp=1

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, https://www.incometaxindiaefiling.gov.in/ या लिंकवर जा आणि अघोषित विदेशी संपत्ति/बेनामी संपत्तिची तक्रार दाखल करण्याच्या पर्यायावर जा. आपल्या पॅन कार्डची माहिती देताना आपण अशा प्रकरणात तक्रार नोंदवू शकता. आपल्याकडे पॅन कार्ड नसल्यास आपण आपला मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी देखील एंटर करू शकता. मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपीच्या मदतीने आपली तक्रार नोंदविली जाईल आणि त्यानंतर आपल्याला एक नंबर दिला जाईल.

https://t.co/GvAoLRd144?amp=1

या नंबरच्या मदतीने आपण या पोर्टलला कधीही भेट देऊ शकता आणि आपल्या तक्रारीवर सरकार काय कारवाई करीत आहे आणि कोणत्या पातळीवर पोहोचले आहे ते पाहू शकता. ही तक्रार काळ्या पैशावर (अघोषित विदेशी संपत्ती आणि उत्पन्न) कर लागू अधिनियम 1961 आणि बेनामी व्यवहार (बंदी) दुरुस्ती अधिनियम अंतर्गत दाखल केली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटने हे पोर्टल तयार केले आहे.

https://t.co/kTBpnP17J0?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment