हसन मुश्रीफांनी दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं : चंद्रकांत पाटलांचं प्रति आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरातून पळून गेलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि सोज्वळ व्यक्तीवर बोलणं योग्य नाही. चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्याचा समाचार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी उशिरा घेतला. त्यांनी हसन मुश्रीफ याना प्रति आव्हान दिले. ते म्हणाले, दुसऱ्या जागी जाऊन निवडून येण्यासाठी धमक लागते. मुश्रीफ यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडून यावं. कागल मतदारसंघात मतांचं विभाजन करुन ते निवडून येतात. त्यांनी दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं,

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सध्या चांगलंच टीकेचं रान पेटलं आहे. दोघेही दररोज एकमेकांवर कोणत्याना कोणत्या कारणाने टीका करीत असतात. रविवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्याव सडकून टीका केली. त्यावरून कोल्हापुरात भाजपचे कार्यकर्ते चांगलेच भडकले. त्यानंतर चंद्र्कांत पाटील यांनीही मुश्रीफ यांचा खरफुस समच्छर घेत त्यांचा प्रति आव्हान केले. तसेच राज्य सरकारच्या कामाचाही चांगलाच समाचार घेतला.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी विकेंड लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उपाययोजनांचा पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपसह मनसेनंही घेतलाय. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारनं लॉकडाऊन, कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला पण राज्य सरकारला एक रुपयाही दिला नाही, अशी टीका केलीय.

You might also like