मुंबई | व्हॅलेंटाईन डे हा एका जोडप्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आनंदी दिवस असतो. यामुळे या जोडप्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब हे वेगवेगळ्या स्कीम्स ठेवत असतात. पण याचा अनेक भामटे वाईट उपयोग करून घेतात. स्कीमच्या नावाखाली फेक मेसेज खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरताना दिसत आहेत. यामध्ये ताज हॉटेलचे सात दिवसाचे पॅकेज जिंकण्याची संधी, नवीन मोबाइल घेण्याची संधी, लाखो रुपये जिंकण्याची संधी अशा प्रकारच्या स्किमना बळी पाडले जात आहे. जाणून घेऊ काय आहे यामागील सत्य.
It has come to our notice that a website has been promoting a Valentine’s Day initiative, offering a Taj Experiences Gift Card via WhatsApp. We would like to inform that Taj Hotels/IHCL has not offered any such promotion. We request to take note of this and exercise due caution.
— Taj Hotels (@TajHotels) January 30, 2021
व्हॅलेंटाईन डे स्कीम ह्या अशा प्रकारच्या मेसेजेस मागील सत्य जाणून घेण्याचा आपण केला. यामध्ये ताज हॉटेलचे सात दिवसाचे पॅकेज असो वा मोफत मोबाईल फोन देणारे मेसेज असो या दोन्ही मेसेजेस ची स्कीम शोधण्याचा प्रयत्न केला. यामागील सत्य पडताळण्यासाठी ताज हॉटेल आणि मोबाईलच्या वेबसाईट शोधल्या. यानंतर असे दिसून आले की दोन्ही मेसेजेस फेक आहेत. ‘हॅकर ‘ हे वापर कर्त्याचा डेटा चोरण्यासाठी या लिंकचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले.
व्हॅलेंटाईन डे च्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर मोबाईल फोन गिफ्ट्स स्कीम, ताज हाँटेल गिफ्ट कार्ड्स स्कीम्स इ. बाबत फसव्या लिंक प्रसारीत होत आहेत. नागरिकांनी अशा फसव्या लिंकला प्रतिसाद देऊ नये. pic.twitter.com/JXtP3mf63c
— Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@ThaneCityPolice) February 1, 2021
ताज हॉटेलने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरून या गोष्टीची माहिती दिली आहे. ताज हॉटेल अशा प्रकारच्या कुठल्याही स्कीम देत नसल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. तसेच ठाणे पोलिसांनीही व्हॅलेंटाईन डे च्या स्कीमचा मेसेज फेक असून, कोणीही या लिंकवरती आपली माहिती देऊ नये. असे आवाहन केले आहे. या लिंकवर माहिती दिल्यास वापरकर्त्याचे नुकसान होऊ शकते. यामुळे सर्व नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.