हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या एफडी वरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली असून त्यामुळे ग्राहकांना धक्काच बसला आहे. बँकेने 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवरील दर कमी केलेले आहेत. नवीन दर हे 25 ऑगस्टपासून लागू होणार आहेत
लाइव्ह मिंट या व्यवसायिक वृत्तपत्राच्या मते, एचडीएफसी बँक आता ग्राहकांना सात दिवस ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.50% व्याज देत आहे. त्याचबरोबर 30 ते 90 दिवसांच्या एफडीला 3 टक्के दराने व्याज मिळेल. 91 दिवस ते 6 महिन्यात मॅच्युर होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 0.50 % खाली आले आहेत. या कालावधीतील एफडीला आता 4 टक्के ऐवजी 3.5 टक्के व्याज मिळत आहे.
9 महिन्यांपासून ते एका वर्षाच्या कालावधीच्या मुदतीची एफडी 4.5 टक्क्यांऐवजी आता 4.4 टक्के व्याज मिळवित आहे. तसेच, 2 ते 3 वर्षात मॅच्युर होणाऱ्या एफडींना आता 5.15 टक्के दराने व्याज मिळू लागले आहे. 3 वर्ष ते 5 वर्षांच्या एफडीवर 5.30 टक्के व्याज मिळेल.
आता आपण लॉन्ग टर्म एफडीबद्दल बोलूयात – 5 वर्ष ते 10 वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या एफडीवरील व्याज दर 5.5 टक्के आहे. या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना सर्व एफडीपेक्षा अर्ध्या टक्क्याने जास्त व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवरील व्याज दर 3.5 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.