हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Health : कोणतेही काम करण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज भासते. ही ऊर्जा आपण जे काही खातो त्यामुळे मिळते. आपल्या शरीराच्या काही भागांना जास्त तर काही भागांना कमी प्रमाणात ऊर्जा लागते.
तर हे लक्षात घ्या कि, शरीरातील सर्वाधिक ऊर्जा मेंदूकडून वापरली जाते. मेंदू शिवाय आपल्याला कोणतेही काम करता येत नाही. मेंदूचे काम खूपच गुंतागुंतीचे असते. चला तर मग मेंदूद्वारे ऊर्जा कशी वापरली जाते हे जाणून घेउयात…
मेंदूसाठी ऊर्जा कशी मिळते ?
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या रिपोर्ट्सनुसार, ग्लुकोज शरीरातील प्रत्येक पेशीसाठी ऊर्जेचा प्राथमिक स्त्रोत आहे. मेंदूमध्ये चेतापेशी, न्यूरॉन्स जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे त्याला सर्वाधिक ऊर्जा लागते. ग्लुकोज पासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मेंदूलाच मिळते. त्यामुळे ग्लुकोज हेच मेंदूचे मुख्य इंधन आहे. Health
मेंदूचे वेगवेगळे भाग अशा प्रकारे ऊर्जा वापरतात
ब्रेन फॅक्ट्सच्या रिपोर्ट्सनुसार, विश्रांती घेणार्या शरीराची 20% ऊर्जा मेंदूकडून वापरली जाते. मेंदूमध्ये दोन भाग असतात ज्याला ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर असे म्हणतात. यापैकी ग्रे मॅटर जास्त ऊर्जा वापरतो तर व्हाईट मॅटर कमी ऊर्जा वापरतो. या ऊर्जेची सर्वात जास्त गरज मेंदूला असते, जी विचार करण्यासाठी आणि शरीराच्या इतर भागांना संदेश पाठवण्यासाठी वापरली जाते. मेंदू झोपेतही काम करत असतो, त्यामुळे त्याला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी ही ऊर्जा वापरली जाते. Health
मेंदू फक्त 10% काम करतो ?
सामान्य माणूस फक्त 10 टक्केच मेंदू वापरतो. एक प्रकारे मेंदू कमी भाग वापरतो हे खरे आहे, मात्र मेंदूमध्ये काही कमतरता आहे म्हणून तसे होत नाही. कारण मेंदू आपली ऊर्जा वाचवू शकतो. जर आपण मेंदूमध्ये स्थित न्यूरॉन्स एकाच वेळी तीन पट ऍक्टिव्ह केले तर त्याला तितकीच ऊर्जा आणि ऑक्सिजन लागेल जितकी धावताना पायाच्या स्नायूंना लागेल. Health
हे पण वाचा :
Sofia Ansari चं Instagram अकाउंट अचानक का बंद करण्यात आलं? Adult कंटेन्टमुळे होती चर्चेत
IPL 2022 : स्पॉट फिक्सिंगने पुन्हा एकदा डोकं वर काढलं, ऋषभ पंतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
मुलांच्या स्वप्नांना प्रोत्साहन द्या, त्यांना आवडतंय ते करू द्या – वैष्णवी ढोरे
Tax Saving : डोनेशन दिल्यानंतर वाचवता येईल टॅक्स??? कसे ते समजून घ्या
Online Banking : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत ??? अशा प्रकारे परत मिळवा