हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। केसगळतीची समस्या सध्याच्या काळात सामान्य झाली आहे. केसगळतीची समस्या भेडसावत असल्याची तक्रार अनेक जण करत असतात. विविध व्हॉट्सअप ग्रुपवरील चर्चांमध्ये केसगळती या विषयाचाही समावेश झाला आहे. सध्या करोनामुळे तणावपूर्ण वातावरण आहे. त्याचा आपल्या शरीरावरही परिणाम होत असतो. या परिस्थितीत अनेकांना नोकरीची चिंता भेडसावत आहे तर अनेकांना इतर कारणांमुळे ताण जाणवत आहे. हा ताण आणि चिंता केसगळतीचं कारण असू शकतं. तसंच गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकांच्या जीवनशैलीत कमालीचा बदल आहे. या बदलांचा परिणाम केसगळती असू शकतो, असे तज्ञाचे म्हणणे आहे.
चिंता किंवा टेन्शनमुळे केसगळतीसारख्या समस्या डोकं वर काढतात. त्यामुळे तुम्हाला ताण जाणवत असेल तर विविध पर्यायांचा अवलंब करुन तो हलका करण्याचा प्रयत्न करा. जसं की, व्यायाम, छंद जोपासणं वगैरे. मानसिक ताण हे केसगळतीचं प्रमुख कारण असतं, असं तज्ज्ञ सांगतात. तणावाची कारणं शोधा आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करा. यासाठी ध्यानधारणा करण्याचा पर्याय आहे. जवळच्या मित्रांशी मोकळेपणानं बोला. कोणत्याही गोष्टीचा किंवा प्रसंगाचा अतिविचार करू नका. लक्षात ठेवा, मानसिक ताणाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असतो. अन्नाचं पचन होण्यास उपयोगी ठरणाऱ्या घटकांचं प्रमाण असंतुलित होणं, हेसुद्धा परिणामांचा एक भाग आहे. अनेकदा केसगळतीवर घरगुती उपाय केले जातात. त्यांचा फायदाच होतो. कांद्याचा रस किंवा कोरफडीच्या गरामध्ये आवश्यक पोषणमूल्य असतात. ते केसांना लावू शकता. शिवाय, आठवड्यात किमान एकदा तरी केसांना तेल लावणं फायद्याचं असतं.
आहारातून पोषणमूल्य मिळणं आवश्यक आहे. अंडी, डाळी, कच्चे शेंगदाणे यातून केसांसाठी उपयुक्त असलेली प्रथिनं मिळतात. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश असावा. तसंच ऑलिव्ह व नारळाचं तेल, तूप, अव्होकॅडो, अक्रोड यामध्ये पोषणमूल्य भरपूर प्रमाणात असतात. त्यांचा देखील आहारात समावेश करावा. कोबी, फुलकोबी, गाजर, काकडी आणि दहीसारख्या पदार्थांच्या माध्यमातून प्रोबायोटीकचं सेवन करणं केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतं. तसंच तणावाखाली असताना साखर आणि कॅफीन असलेल्या पदार्थांचा सेवन करणं टाळावं. त्याऐवजी ज्वारी, बाजरी, राजगिरा, क्विनोआ, फायबरयुक्त फळं आणि भाज्यांची निवड करावी. योग्य प्रमाणात पोषणमूल्यांचं सेवन केल्यानं केसगळती कमी होण्यास मदत होते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in