नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाची तारीख जाहीर केली आहे. त्रिपुरात एका सभेवेळी बोलताना हि तारीख (Ram Mandir) जाहीर केली आहे. त्रिपुरामधील एका सभेवेळी अमित शहा बोलताना म्हणाले कि अयोध्येत पुढच्या वर्षी 1 जानेवारीला भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले अमित शहा?
अमित शहा यांनी काँग्रेससह विरोधी पक्षावर राम मंदिराच्या (Ram Mandir) मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. काँग्रेसशिवाय इतर पक्ष अयोध्येत मंदिर कधी होणार याची तारीख विचारायचे. निवडणुकांच्या प्रचार सभांमध्येही हा प्रश्न उपस्थित केला जात होता. तसेच काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा बराच काळ न्यायालयात अडकवून ठेवला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचा रस्ता मोकळा झाला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राम मंदिराचे (Ram Mandir) काम वेगाने सुरु करण्यात आले. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील जागेच्या वादावर निकाल देताना राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला होता. तसेच मशिदीच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने 5 एकर भूखंड द्यावा असे आदेश देण्यात आले होते. या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत जाऊन राम मंदिराचे भूमीपूजन केले होते.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती