दारू पिऊन मंदिरात प्रवेश निषिद्ध तर अल्कोहोलने हात धुतलेल्यांना प्रवेश कसा द्यायचा; पुजाऱ्याचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पाचव्या टप्प्यातील संचारबंदी सुरु झाली आहे. यामध्ये बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये ८ जूनपासून देशातील धार्मिक स्थळे उघडण्याची तसेच नागरिकांना येथे प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ८ जूनपासून बहुतांश राज्यातील मंदिरे नागरिकांसाठी खुली केली जाणार आहेत. मात्र नागरिकांना मंदिरात प्रवेश घेण्यासाठी सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक असणार आहेत. शासन मंदिरांमध्ये सॅनिटायझर मशीन लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर आक्षेप की=घेत एका पुजाऱ्याने दारू पिऊन मंदिरात प्रवेश निषिद्ध तर अल्कोहोलने हात धुतलेल्यांना प्रवेश कसा द्यायचा असा सवाल केला आहे. त्यांच्या या प्रश्नामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

सॅनिटायझर अर्थातच जंतूंचा, विषाणूंचा नाश करण्यासाठी वापरले जाते मात्र यामध्ये अल्कोहोलची मात्रा असते. अध्यात्मात दारू पिणे निषिद्ध मानले गेले आहे. मग अल्कोहोल युक्त सॅनिटायझर वापरून नागरिकांना मंदिरात प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न या पुजाऱ्याने विचारला आहे. आणि याला विरोध केला आहे. भोपाळ येथील वैष्णव धाम मधील नाव दुर्गा मंदिराचे चंद्रशेखर तिवारी हे पुजारी आहेत. ते म्हणतात, ‘सरकारचे काम मागर्दर्शिका जाहीर करणे हे आहे, मात्र मी मंदिरात सॅनिटायझर मशीन लावण्याच्या विरोधात आहे कारण यात अल्कोहोल असते.” असे म्हणत त्यांनी आपला विरोध दर्शविला आहे.

 

चंद्रशेखर तिवारी यांनी म्हंटले आहे, ‘आपण दारू पिऊन मंदिरात प्रवेश करू शकत नाही, तर अल्कोहोल ने हात कसे धुवू शकतो? तुम्ही मंदिरांच्या बाहेर हात धुण्याच्या मशीन लावा पण तिथे साबण ठेवा. आम्ही त्याचा स्वीकार करतो. आणि तसेही लोक घरातून अंघोळ करूनच मंदिरात येतात.’ भोपाळ च्या या पुजारींचे म्हणणे ऐकून प्रशासन काय निर्णय घेते यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’. 

 

Leave a Comment