नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपी पतीने आधी पत्नीची हत्या करून मग स्वतः विष घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीवर दवाखान्यात उपचार सुरु होते. यादरम्यान पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेला आणि मानसिक तणावातून पत्नीची हत्या (Murder) करत पतीनं आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहर हादरलं आहे. या दाम्पत्याला एकूण तीन मुलं असून ती तिन्ही पोरे आता अनाथ झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यातील कासारपेठ या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे.
काय घडले नेमके ?
कासारपेठ परिसरात शुक्रवारी सकाळी पत्नीला भोसकून पतीनं आत्महत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. माहूर तालुक्यातील मौजे कासारपेठ येथील विजय गुलाब जाधव व त्याची पत्नी निशा हे दोघेही काल कासारपेठ शिवारातील शेतात काम करण्यासाठी गेले होते. या दरम्यान सकाळी साडे आठ ते नऊच्या सुमारास गुलाब जाधव यांचे त्यांच्या पत्नीसोबत भांडण झाले. हे भांडण एवढे टोकाला गेले कि त्यांनी शेतातील कामासाठी नेलेल्या धारदार हत्याराने पत्नीवर वार करून तिची हत्या (Murder) केली. यानंतर विलास घटनास्थळावरून पळून गेला.
त्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जखमी झालेल्या निशाला माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी सिंदखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशा आणि विजय यांना एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. आई-वडील यांचं छत्र हरपल्यानं ही तिन्ही मुलं पोरकी झाली आहेत. जखमी असलेल्या निशाला अधिक उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आले त्या दरम्यान पत्नी निशाचा मृत्यू झाल्याची अफवा कुणीतरी पसरवली, आता आपलं काही खंर नाही, या भीतीतून मग पती विजयने विष घेऊन आत्महत्या केली आहे. सिंदखेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा :
अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!
कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र
मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!
मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान
आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा