मी लुक्क्यांना धमकी देत नाही; निलेश राणेंचे रोहित पवारांवर पुन्हा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निलेश राणे त्यांच्या ट्विटर च्या पोस्ट मुळे या काळात चांगलेच चर्चेत आले आहेत. आपल्या विशिष्ट शैलीमुळे त्यांचे ट्विट चांगलेच गाजते आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात केलेल्या ट्विटमुळे त्यांनी तृतीयपंथीयांचा रोष ओढावून घेतला होता. नंतर त्यांना माफीही मागावी लागली. आता त्यांनी आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या एका मुलाखतीतील विधानाला उत्तर देत मी अशा लुक्क्यांना धमकी देत नाही असे ट्विट केले आहे.

नुकतीच रोहित पवारांनी बीबीसी मराठी ला ऑनलाईन मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत मुलाखतकाराने निलेश राणेंच्या बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी आता मी त्यांच्या विधानांकडे फारसे लक्ष देत नाही. पवार साहेबांनी साखरेवर केंद्र सरकारशी केलेल्या पत्रव्यवहारावर निलेश राणेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर रोहित पवार यांनी त्यांच्याशी संवाद केला होता. मात्र नंतर त्यांची भाषा आणि त्यांचे विचार पाहता, विचारांची पातळी पाहता मला त्यांच्याशी संवाद साधण्यात फार स्वारस्य वाटले नाही आणि मी प्रतिक्रिया देणे बंद केले असून आता मी दुर्लक्ष करतो आहे. आणि त्यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही असे ते म्हणाले होते.

 

यावर निलेश राणे यांनी ट्विट केले असून “अरे येड्या मी धमकी दिलीच नाही, अशा लुक्क्यांना मी धमकी देत नाही आणि राहिला विषय विचारांच्या लेव्हलचा तर तुला समजेल त्याच भाषेत समजवलं तुला” असे ट्विट त्यांनी केले आहे. माझा आणि निलेश राणे यांचा फारसा संबंध आलेला नाही. त्यांच्या बंधूंशी काही वेळा चर्चा होत असते पण निलेश राणेंशी संवाद साधण्याची ईच्छा नाही आहे असेही रोहित पवार या मुलाखतीत म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.