आज प्रभु रामाचं राज्य असतं तर शेतकर्‍यांवर अत्याचार झाला नसता….

अहमदाबाद । प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी अडवल्यामुळे पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमधील संघर्ष वाढत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांवर दगडफेक आणि ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर बचावात्मक पवित्रा पत्करत पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराचे नळकांडी फोडली. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर आपला मोर्चा वळवळा असून लाल किल्ल्यावरच किसान आंदोलनाच ध्वज फडकवला आहे. त्यामुळे, आंदोलनाल हिंसक वळण लागलंय.कालच्या या सर्व घटनेनंतर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येत असून विरोधक दिल्लीतील हिंसाचारावर मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत.

गुजरात काँग्रेस अध्यक्ष हार्दिक पटेल यांनीही मोदी सरकारवर शेतकरी आंदोलनातील हिंसाचारावरून टीका केली आहे.  ”आज प्रभु रामाचं राज्य असतं तर शेतकर्‍यांवर अत्याचार झाला नसता,” अशी टीका हार्दिक पटेल यांनी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही काल, मोदी सरकारने त्वरीत तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असे सूचवले आहे. हिंसा हे कुठल्याच समस्येचं समाधान नाही. इजा कोणालाही होऊ द्या, नुकसान आपल्याच देशाचं होणार आहे. देशाच्या हितासाठी कृषी विरोधी कायदे माघारी घ्या, असे राहुल यांनी आपल्या टिवटर अकाऊंटवरुन म्हटलंय.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. एकीकडे पोलीस आणि सरकारकडून हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे आता शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी कृषी आंदोलनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय किसान युनियन (भानू) ठाकूर भानू प्रताप सिंह यांनीही शेतकरी आंदोलनातून माघार घेतली. आंदोलनातून माघार घेणाऱ्या दोन्ही संघटना ह्या उत्तर प्रदेशमधील आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’. 

 

You might also like