घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे सध्या सर्व शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसही बंद आहेत. त्यामळे आता लहान मुले असो की मोठी, सर्व मुले ऑनलाइनच शिक्षण घेत आहेत. ज्यामुळे ऑनलाइन क्लासेसची क्रेझ बरीच वाढली आहे. जर आपणही घरात रिकामेच असाल किंवा आपली नोकरी गमावली असेल तर काळजी करण्याची काहीच आवश्यक्यता नाही. निराश होण्याची तर अजिबात होण्याची गरज नाही कारण असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे तुम्हाला पैसे कमविण्याची चांगली संधी तर देतातच आणि आपल्याला इंडीपेंडेंटही बनवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जीने आपली आयटी कंपनीची नोकरी सोडली आणि घरातच फक्त तीन तासांसाठी एक खास टीचिंग कोर्स घेऊन महिन्याला ४०,००० रुपये कमावते आहे.

दिल्लीतील मॉडेल टाऊनमध्ये राहणारी नेहा नारंग, दिवसातून ३ तास मुलांना शिकवते आणि २ तास शिक्षकांना स्पेशल ट्रेनिंग देते. नेहाने एका वहिनीला दिलेल्या आपल्या मुलाखतीत सांगितले की, तिने इंजीनियरिंगचा अभ्यास केलेला आहे, पण लग्नानंतर तिला आपली आयटी कंपनीची नोकरी सोडावी लागली. पण नेहाला घरातच बसून राहणे आवडत नव्हते. म्हणूनच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. नेहाला दोन लहान मुलंही आहेत, त्यामुळे नेहा जास्त वेळ घरा बाहेर देखील राहू शकत नाही. म्हणूनच त्या अशा व्यवसायाच्या शोधात होत्या जो घरातच बसून करता येईल आणि यामुळे चांगली कमाई देखील होईल.

४० हजार रुपये / महिना कमावते- नेहाला दरमहा ४० हजार रुपये मिळतात. ती सध्या अशा कंपनीशी जोडली गेलेली आहे जी केजी ते आठवीपर्यंतच्या मुलांची गणिताची शिकवणी घेते. या कंपनीचे नाव Cuemath असे आहे. देशभरात याची ३००० हून अधिक केंद्रे आहेत. जी खास महिलांना घरात राहूनच पैसे कमवण्याची संधी देतात. या कंपनीबद्दल अधिक माहितीसाठी आपण www.cuemath.com वेबसाइटवर लॉग इन करू शकता.

Cuemath सह पैसे कसे कमवायचे ते जाणून घ्या:

>> Cuemath चा मेंबर होण्यासाठी पहिले तुम्हाला Cuemath च्या वेबसाइटवर जावे लागेल.
>> त्यानंतर तुम्हाला become a teacher या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
>> त्यानंतर एक फॉर्म येईल. हा फॉर्म भरावा लागेल आणि तो सबमिट करावा लागेल.
>> फॉर्म फिल केल्यांनंतर आपले काम संपेल. या अटी पूर्ण केल्यावर Cuemath आपल्याला कॉल करेल.
>> त्यानंतर तुमची ऑनलाइन टेस्ट आणि टेलीफोनिक इंटरव्यू घेण्यात येईल.
>> जे क्लियर केल्यानंतर आपण आपण शिक्षक बनू शकताल.

पात्रता: शिक्षक होण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच दहावीपर्यंत गणित शिकवा.
शुल्क – आपल्याला कंपनीकडून प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी कंपनी ६००० रुपये घेते.

आपण घरी शिकवू शकता
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एक लहानशी खोली लागेल ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना बसून शिकवू शकता. विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी आपल्याला स्वतःलाच मार्केटिंग करावे लागेल. आपण या मार्केटिंग साठी आपल्या सभोवतालचे मित्र आणि सोशल मीडिया देखील वापरू शकता. नेहा नारंगनेही असेच करुन सुरुवात केली. नेहाने २०१६ मध्ये हा व्यवसाय सुरू केला तेव्हा तिचे फक्त ३ विद्यार्थी होते. मात्र आज त्यांचे सुमारे ३२ विद्यार्थी आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.