हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्य सरकारकडून राज्यातील निर्बंधांमध्ये काहीशा प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविण्याबाबत विचारही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे की, “राज्यात १ ऑगस्टपासून निर्बंध अजून शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली.”
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारतर्फे राज्यात कडक स्वरूपाचे निर्बंध घातले गेले होते. सध्या कोरोनात घेत होताना दिसत असल्याने राज्य सरकारने निर्बंधात शिथिलता देण्याबाबत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली. यानंतर. आज आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळातील चर्चेबाबत माहिती दिली आहे. डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे की, १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील निर्बंधात अधिक वाढ करायची की शिथिलता द्यायची? यासंबंधी अंतिम निर्णय घेणार आहे
टोपे पुढे म्हणाले की, अजूनही धोका तळलेला नाही. दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. मात्र, तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येई नाही. या लाटेशी दोन हात करण्यासाठी राहय सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या असून लहान मुलांसाठी लागणाऱ्या औषधांचीही तयारी केली आहे. सध्या राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण अजूनही जास्तच आहे. त्यामुळे या ठिकाणी निर्बंध शिथील केले जाणार नाही.