हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर महिन्यात अनेक मोठे बदल केलेले आहेत. हे बदल फिक्स्ड डिपाजिट, लोन, एटीएममधून पैसे काढण्याशी संबंधित आहेत. या कारणास्तव, हे नियम बदलल्यास त्याचा थेट परिणाम हा ग्राहकांवर होईल. जर तुम्ही देखील एसबीआयचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. एसबीआयने कोणकोणत्या गोष्टी बदलल्या आहेत ते जाणून घेउयात.
एटीएम फ्रॉडच्या वाढत्या घटना पाहता बँकेने कॅश पैसे काढण्याचे नियम बदलण्यात आले आहेत. एसबीआयने एटीएम 24 × 7 मध्ये वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा 18 सप्टेंबरपासून देशभरातील सर्व एसबीआय एटीएमवर लागू होईल. त्यापूर्वी फक्त रात्रीच्या वेळी एटीएम फसवणूक टाळण्यासाठी एसबीआयने 1 जानेवारी 2020 पासून OTP वर आधारित एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली होती. त्याअंतर्गत एसबीआयच्या एटीएममधून सकाळी आठ ते सकाळी आठ या वेळेत 10,000 रुपयांची कॅश आणि अधिकची रक्कम काढताना OTP आवश्यक करण्यात आला होता.
भारतीय स्टेट बँक लवकरच ग्राहकांना लोन रीस्ट्रक्चर सुलभ करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. या प्लॅटफॉर्मवरून निर्णय घेतला जाईल की, कोणत्या ग्राहकांना किती दिवस एसबीआयचे लोन मोरेटोरियम मिळेल. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा प्लॅटफॉर्म सुरू होईल अशी अपेक्षा आहे. हे 24 सप्टेंबरला लाँच केले जाऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.
(SBI)ने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट स्कीम (Special Fixed Deposit Scheme) मध्ये गुंतवणूक करण्यासाठीची शेवटची तारीख वाढविली आहे. मे महिन्यात बँकेने एसबीआय वीकेयर सीनियर सिटीजन्स टर्म डिपॉजिट स्कीम (SBI WECARE Senior Citizens Term Deposit scheme) ची घोषणा केली होती. सध्या घसरत जाणारे व्याज दर पाहता ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज दर देण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे. येत्या वर्षाच्या अखेरीस ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पेशल एफडी योजना उपलब्ध होईल. तत्पूर्वी, बँकेने 30 सप्टेंबरपर्यंत ही योजना व्हॅलिड असल्याचे जाहीर केले.
एसबीआयने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना धक्का देऊन FD वरील व्याज दर कमी केले आहेत. एसबीआयने रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉजिटवरील व्याज 1-2 वर्षांच्या कालावधीत 0.20 टक्क्यांनी कमी केले आहे. म्हणजेच आता एसबीआयच्या FD चा फायदा कमी झाला आहे. नवीन व्याजदर हे 10 सप्टेंबर 2020 पासून लागू झाले आहेत. यापूर्वी एसबीआयने 27 मे रोजी FD चे व्याज दर कमी केले होते. पारंपारिक, सुरक्षित आणि निश्चित व्याज उत्पन्नासाठी देशात FD मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.