अर्जेटिनामध्ये ‘या’ केमिकलमुळे तलावाचे पाणी झाले गुलाबी, लोकं करत आहेत चिंता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अर्जेटिना । अर्जेटिनाच्या दक्षिणेकडील पॅटागोनिया भागात, एका मोठ्या तलावाचे संपूर्ण पाणी गुलाबी झाले आहे. तलाव आणि पर्यावरणीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की,” हे तलाव गुलाबी होण्याचे कारण म्हणजे एक केमिकल आहे, ज्याचा उपयोग लॉबस्टरच्या निर्यातीत केला जातो.

तलावाच्या पाण्याचा रंग सोडियम सल्फेटमुळे होतो, जो मासे कारखान्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. त्याच्या कचऱ्याला चूबूत नदी प्रदूषित करण्यासाठी जबाबदार धरले जात आहे. या नदीचे पाणी लेक कॉर्फो आणि पाण्याच्या इतर स्त्रोतांकडे जाते.

नदी आणि तलावाच्या सभोवतालच्या पर्यावरणाची हानी होत असल्याच्या तक्रारी अनेक स्थानिक लोकं बर्‍याच काळापासून करत आहेत, परंतु याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ट्रीलेव शहरातील स्थानिक लोकंही या प्लॅंटमधून तयार होणार्‍या कचर्‍यामुळे त्रस्त आहेत. यामुळे दिवस-रात्र शहरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे आजार देखील पसरत आहे.

पर्यावरण कार्यकर्ता असलेले पाब्लो लाडा म्हणाले की,” ज्यांच्याकडे पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी आहे तीच लोकं हे विष पसरवत आहेत. गेल्याच आठवड्यात हा तलाव गुलाबी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यावरण इंजीनिअर असलेले फेडेरिको म्हणाले की,” सोडियम सल्फेटमुळे या पाण्याचा रंग गुलाबी झाला आहे. कायद्यानुसार माशांचा कचरा नदी किंवा पाण्यात सोडण्यापूर्वी तो स्वच्छ केला पाहिजे. मात्र तलावाजवळील कंपनी हा कायदा पाळत नाही. “