हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यूयॉर्क शहरात मरण पावलेल्या लोकांची संख्या मंगळवारी ३;२०० पेक्षा जास्त झाली, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९/ ११ च्या हल्ल्यात ठार झालेल्यांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनही आयसीयूमध्ये दाखल झाले आहेत, बहुधा जगातील हज पहिला मोठा नेता आहे,जो या विषाणूचा बळी ठरला आहे.
जगभरात या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि आतापर्यंत ७५,५०० लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, संसर्गाच्या १३.५ लाखाहून अधिक घटनांची पुष्टी झाली आहे, जे की आगामी काळात हि परिस्थिती आणखी बिघडू शकेल असा इशारा देत आहेत. न्यूयॉर्क आणि युरोपच्या काही भागात, संकट कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत.
तथापि, आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, चीनच्या वुहानमध्ये अखेर ७६ दिवसानंतर लॉकडाउन हटविण्यात आले, जिथून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि जगभर पसरला. कोविड -१९ मध्ये न्यूयॉर्क शहरातील कमीतकमी३,२०२ लोकांचा बळी गेला आहे.९ / ११ रोजी अमेरिकेवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात शहरातील २,७५३ लोक तर एकूण २९७७ लोक ठार झाले होते, जेव्हा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर २००१ रोजी पेंटागॉनमधील दोन बुरुजांवर विमानांना धडकवले होते आणि पेंसिल्व्हिणिया या परिसरात एक विमान पडले होते.
न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू कुओमो म्हणाले की, राज्यात कोरोना विषाणूमुळे दिवसभरात ७३१ मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे राज्यभरात एकूण मृत्यूची संख्या ५,५००वर पोहोचली आहे, एका दिवसात होणाऱ्या मृत्यूच्या संख्येमध्ये ही सर्वाधिक संख्या आहे. ते म्हणाले, “आज बरेच न्यूयॉर्कवासी पुन्हा दु: खी होत आहेत.” तथापि, राज्यपालांनी असे सांगितले की रुग्णालयात नवीन संसर्ग आणि गंभीर आजारी रूग्णांची संख्या कमी होत आहे,यावरून हे सूचित होतंय की एकमेकांपासून अंतर ठेवण्यासाठी घेतलेल्या उपाययोजना यशस्वी होत आहेत. ”
स्पेनमध्ये मंगळवारी कोरोना विषाणूमुळे ७४३ मृत्यू झाले आणि आरोग्य मंत्रालयाच्या मते या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या १३,७९८ वर पोहोचली आहे, तर संक्रमणाची संख्या १,४०,५१० पर्यंत पोहोचली आहे. कोरोना विषाणूचा सर्वाधिक त्रास झालेल्या इटलीमध्ये आतापर्यंत १६,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
फ्रान्समध्ये मृतांचा आकडा १०,००० च्या वर गेला आहे. देशाचे राष्ट्रीय आरोग्य संचालक जेरोम सॉलोमन म्हणाले की मृतांची संख्या १०,३००ओलांडली आहे. ते म्हणाले की आम्ही साथीच्या आजाराच्या गंभीर स्थितीत आहोत, पण लवकरच परिस्थिती ठीक होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जॉन्स हॅपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, जगभरात सुमारे ३००,००० लोक उपचारानंतर या आजारामधून बरे झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.