क्वालिटीच्या तक्रारी असुनसुद्धा भारत सरकार विकत घेणार चीन कडून वेंटिलेटर अन् मास्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासहित जगातील अनेक देश कोरोनाव्हायरस विरोधात लढत आहेत.जगभरात कोरोनाच्या संक्रमणाची आणि नागरिकांच्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या दरम्यानच्या बातमीत भारत कोविड -१९ पासूनच्या बचावासाठी चीनकडून व्हेंटिलेटर्सशिवाय आणि आयइ गियर सारखे पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई) खरेदी करणार आहे. तथापि, या यादीमध्ये टेस्टिंग किटचा समावेश नाही,कां त्यामध्ये काही देशांना त्रुटी आढळल्या आहेत.

शासकीय खरेदीसाठी चायनिज कंपन्यांसह सरकार कमर्शियल डील करणार आहे. सूत्रांनी सांगितले की भारत या शेजारी देशाकडून टेस्टिंग किट घेणार नाहीये. चीन ने स्पेन,झेक रिपब्लिक आणि तुर्की आदी देशांना टेस्टिंग किट सप्लाइ केले होते,परंतु त्यांना या किटमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.फिलीपंस ने टेस्टिंग किट खराब होण्याची तक्रार केली आहे.

भारत मध्ये अद्याप कोरोना व्हायरसच्या संक्रमितांची संख्या १४४० इतकी आहे, मीडिया रिपोर्ट्समध्ये नुसार हा आकडा १६६० पार झाला आहे. तर, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ३८ लोकांना जीव गमवावा लागला आहे. तथापि, हेल्थ एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार १३० अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशात कोरोना अजून धुमाकूळ घालणार आहे कारण आपली आरोग्य व्यवस्था खराब आहे.आरोग्यासाठी व्यवस्था दुरस्त करणे आणि या विषाणूंच्या संसर्गापासून बचाव करण्याचा उपाय शोधणे खूप गरजेचे आहे.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, भारत लवकरच चीनकडून एन-९५ मास्क आणि व्हेंटिलेटर सारख्या महत्वपूर्ण वैद्यकीय इक्विप्मेंट खरेदीवर विचार करत आहे. चीनकडून होणाऱ्या या खरेदीमुळे भारतावरचा दबाव कमी होणार आहे,कारण या साथीच्या रोगावर लढायची तयारी चालू आहे. एन-९५ मास्क आणि पीपीई यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकणार नाही आहे कारण ते तयार करणे आवश्यक असणारे कॉम्पोनंट चीन आणि दक्षिण कोरियामधून आयात केले जातात. जाणकारांचे निरीक्षण, भारतात २१ दिवस लॉकडाउनमुले या विषाणूचे संसर्ग कमी होईल परंतु तेपूर्णपणे घालवणे शक्य नाही. ते म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा सगळे आकडे भारटाकडे नाही आहे. अजूनही बऱ्याच लोकांच्या संसर्गाचे परीक्षण झाले नाही.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीच्या अनुशंगाने भारत-रविवारीपर्यंत ३५ हजार लोकांच्या संसर्गाची तपासणी झाली. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण खूपच कमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’