नवी दिल्ली । कोरोना (Covid 19) ची वाढती प्रकरणे लक्षात घेता राज्य सरकारांनी अनेक निर्बंधं घालण्यास सुरूवात केली आहेत. अनेक राज्यात नाईट कर्फ्यू लागू देखील करण्यात आला आहे. काही शहरांमध्ये तर पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे तर काहींमध्ये शनिवारी आणि रविवारी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत की, देशात रेल्वे प्रवासी गाड्या पुन्हा बंद होणार का? रेल्वे बोर्डाकडून याबाबत नुकतेच एक निवेदन देण्यात आले आहे. मध्य रेल्वेने ट्वीट करून म्हटले आहे की, ‘प्रवाश्यांनी लक्ष द्या’ घाबरू नका, गाड्या सुरूच राहतील ‘. तसेच रेल्वेकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, घोषित केल्या गेलेल्या लांब पल्ल्याच्या नियमित आणि स्पेशल गाड्या नियमितपणे सुरू राहतील.
रेल्वे गाड्या बंद होण्याबाबत रेल्वेने दिले ‘हे’ निवेदन
“समर स्पेशल गाड्या सतत चालविण्यात येत आहेत.” असे रेल्वे बोर्डाने बुधवारी निवेदन जारी केले. यावेळी लोकांना हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की,”घोषित केल्या केलेल्या लांब पल्ल्याच्या नियमित आणि स्पेशल गाड्या सुरूच राहतील, कोविड -19 च्या नियमांचे पालन करण्यासाठी या सर्व स्पेशल गाड्यांमध्ये फक्त कन्फर्म तिकीट असणार्या प्रवाशांनाच चढण्याची परवानगी आहे.”
90 मिनिटांपूर्वी स्टेशन पोहोचावे लागेल
रेल्वेने सांगितले,”लोकांनी घाबरू नका आणि स्टेशन धाव घेऊ नका अशी विनंती केली जात आहे, फक्त 90 मिनिटांपूर्वी स्टेशनवर पोहोचा. रेल्वे वेटिंग लिस्ट सतत लक्ष देऊन असते. गरजेनुसार अतिरिक्त स्पेशल गाड्या चालवल्या जातील.”
कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. संपूर्ण लॉकडाऊनच्या भीतीने लोकं पुन्हा आपले सामान उचलून आपल्या गावी निघाले आहेत. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी जमा होते आहे. लोकांमध्ये पॅनीक बाइंग पाहून मध्य रेल्वेने ट्विट करुन लोकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी
कोरोनाचा व्यापक प्रसार महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दिसून येत आहे. ते पाहता तातडीने अंमलबजावणी करून अनेक रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबविण्यात आली आहे. ज्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री बंद करण्यात आली आहे त्यात लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या सीपीआरओचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयने ही माहिती दिली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा