विराटचा विजयी रथ धोनी रोखणार का? चेन्नई- बंगळुरू मध्ये आज महामुकाबला

0
58
csk vs rcb
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 मध्ये आत्तापर्यंत अपराजित राहिलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा सामना फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरोधात आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या आरसीबीची विजयी गोडदौड महेंद्रसिंग धोनी रोखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा 10 गडी राखून पराभव केला . कर्णधार विराट कोहली, एबी डीविलीर्स आणि ग्लेन मॅक्सवेल कुटून धावा काढत आहेत. त्यातच मागील सामन्यात आक्रमक सलामीवीर देवदत्त पद्दीकल याने दणदणीत शकत ठोकल्याने आरसीबीची फलंदाजी अजून मजबूत झाली आहे. त्यातच विशेष म्हणजे गोलंदाजांच्या दमदार फॉर्म मुळे बेंगलोर चा संघ प्रथमच खूप संतुलित वाटत आहे.

तर दुसरीकडे चेन्नई देखील तीन विजयामुळे फ़ॉर्मात आहे. सलामीवीर फाफ डुल्पेसीस, सुरेश रैना , मोईन अली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यामुळे चेन्नईची फलंदाजी मजबूत आहे. अशा परिस्थितीत आरसीबीसाठी चेन्नईला हरवणे सोपे नसणार आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here