खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील शास्त्रज्ञ कोविड-१९ वरील लस आणि औषध तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. या प्रकरणात, भारताच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसवरच्या संभाव्य प्रभावी औषधाविषयी एका अभ्यासाच्या निकालांच्या आधारे महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

समुद्री लाल शैवालांपासून तयार केलेली संयुगे सॅनिटरी वस्तूंवर लेप म्हणून वापरले जाऊ शकतात आणि जी कोविड -१९ शी लढण्यासाठी अँटीव्हायरल औषधांच्या निर्मितीमध्ये देखील वापरली जाऊ शकतात. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.

अँटीवायरल संभाव्यतेसह नैसर्गिक गोष्टी
संशोधकांनी असे म्हटले आहे की नैसर्गिक स्त्रोतांपासून तयार केलेली उत्पादने, जसे की वनस्पती आणि प्राणी, जीवाणू, बुरशी आणि मोठ्या वनस्पतींमध्ये व्हायरसमुळे होणा-या रोगांविरूद्ध लढा देण्याची मोठी क्षमता असते. सीग्रास, अल्गिनेट्स, फ्यूकोडिन, कॅरेजेनन, रामानन सल्फेट सारख्या पॉलिसेकेराइड्ससारख्या नैसर्गिक संयुगांमध्ये जबरदस्त अँटीव्हायरल क्षमता असते.

खूपच उपयोगी आहे लाल समुद्री शैवाल
‘मरीन रेड अल्गा पोरफिरिडियम एज ए सोर्स ऑफ सल्फेटेड पॉलीसकाराइड्स फॉर कंबेटिंग अगेंस्ट कोविड-१९’ या अभ्यासानुसार, संशोधकांनी सध्याच्या उपलब्ध आकडेवारीच्या संदर्भात लाल समुद्री शैवालात असलेल्या सल्फेट पॉलिसेकेराइड्सच्या अँटीव्हायरस संभाव्यतेची तपासणी केली.

प्रिप्रिंट्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, “पोर्फयरीडियम (रेड मायक्रो-शैवाल) मध्ये आढळणाऱ्या एसपी (सल्फेट पॉलिसेकेराइड) च्या विषाणूविरोधी गतविधी बद्दल जगभरातील विविध विश्लेषण रिपोर्ट्स असे स्पष्ट करतात की हे शैवाल अनेक विषाणूजन्य आजारांच्या उपचारासाठी एक महत्त्वपूर्ण घटक ठरू शकते. “

Why Red Algae Never Packed Their Bags for Land - Scientific ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

हे पण वाचा –

www.hellomaharashtra.in

Leave a Comment