हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच असे म्हटले आहे की,’ अमेरिकेत सर्वाधिक कोरोना विषाणूचा संसर्ग होणे हा एक प्रकारचा बहुमानच आहे’. मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एक कार्यक्रमात ते म्हणाले, ‘जेव्हा आपण असे म्हणता की,’ आम्ही संसर्गाच्या बाबतीत पुढे आहोत, तेव्हा मला यात हरकत वाटत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की, आम्ही इतरांपेक्षा जास्त चाचण्या घेतल्या आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण हे दाखवते की आमची चाचणी ही इतरांपेक्षा अधिक चांगली आहे. मला तर हा एक प्रकारचा सन्मानच वाटतो.’ अमेरिकेत आतापर्यंत १५ लाख ७० हजारांहून अधिक कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत तसेच येथे ९३ हजारांहून अधिक मृत्यू देखील झालेले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावर अमेरिकेतील विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने टीका केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नॅशनल कमिटीने यावर उत्तर देताना म्हटले आहे की, “देशात कोरोना विषाणूची १० लाखाहून अधिक प्रकरणे होणे हे आपल्या देशातील नेतृत्वाचे पूर्णपणे अपयश आहे.” गेल्याच आठवड्यात सिनेटच्या बैठकीत, सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी कोरोनाच्या कमी पडलेल्या चाचणीवरही प्रश्न उपस्थित केले होते. रिपब्लिकनचे खासदार मिट रोमनी म्हणाले की,’ अमेरिकेचा चाचण्या घेण्याचा रेकॉर्ड तितकासा चांगला नाही आहे. इथे फेब्रुवारी मार्चपासून संसर्गाची प्रकरणे समोर येऊ लागली तसेच आतापर्यंत इथे पुरेश्या चाचण्याही झालेल्या नाहीत.’
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते, प्रत्येक एक हजार लोकांच्या चाचणी घेण्याच्या बाबतीत अमेरिका १६ व्या स्थानावर आहे. या यादीमध्ये तो आईसलँड, न्यूझीलंड, रशिया आणि कॅनडा सारख्या देशांच्याही मागे आहे. अमेरिका दररोज तीन ते चार लाख लोकांची तपासणी करीत आहे. हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार जर आपली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची असेल तर आपल्याला दररोज किमान ५ लाख चाचण्या घेण्याची आवश्यकता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.