नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून आज ८ ऑगस्ट रोजी ठीक चार वाजता भाषण करणारा आहेत. या भाषणात नरेंद्र मोदी काही मोठी घोषणा करतील असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्याच प्रमाणे कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयावर देखील नरेंद्र मोदी जनतेशी सांधल्या जाणाऱ्या संवादात भाष्य करतील.
शिवस्वराज्य यात्रेवरून राष्ट्रवादीत फूट
कलम ३७० रद्द केल्यानंतर देशातील जनतेने मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. त्यानंतर त्यांनी मुक्त कंठाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुतीकरून त्यांच्या नेतृत्वात विश्वास व्यक्त केला. हाच धागा पकडून नरेंद्र मोदी जनतेला संबोधतील अशी शक्यता आहे. त्याच प्रमाणे कश्मीरमध्ये सध्या असणाऱ्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेवर आणि काश्मीरच्या भविष्यावर देखील मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे.
कृष्णा नदीत बचाव कार्याची बोट उलटून १५ जण बेपत्ता ; ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
नरेंद्र मोदी यांनी याआधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर २७ मार्चला देशाच्या जनतेला संबोधून भाषण केले होते. नरेंद्र मोदी यांचे आजचे भाषण आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रावरून ऐकवले जाणार आहेत. तसेच काही तासांनी त्याचे क्षेत्रीय भाषणामध्ये भाषांतर देखील केले जाणार आहे. आता नरेंद्र मोदी देशाला उद्देशून नेकमे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नरेंद्र मोदी कालच देशाला उद्देशून भाषण करणार होते. परंतु भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाल्याने त्यांनी हा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला.
म्हणून सुषमा स्वराज यांचे निधन होताच त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ढसाढसा रडले
नरेंद्र मोदी यांनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन
३७० कलमासंदर्भातील विधेयक लोकसभेत देखील संमत