हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारनं जनता कर्फ्यूच्या कालावधीत वाढ केली आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज पाळण्यात येत असलेला जनता कर्फ्यू उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार असून ३१ मार्चपर्यंत तो लागू राहणार आहे. या कर्फ्यूतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली. करोनाचा प्रसार ज्या गुणाकार पद्धतीनं होत आहे. त्याला रोखण्यासाठी सरकारनं निर्णय घेतला असल्याचे राजेश टोपे यांनी येवेळी माध्यमांना सांगितलं.
सरकारच्या आदेशानुसार, उद्या पहाटे ५ वाजल्यापासून ३१ तारखेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांनी एका जागी एकत्र जमता येणार नाही आहे. या आदेशातून बँकिंग, फायनान्शिल, दूध, फळे, भाजीपाला, विमान, रुग्णालये, बंदरे, मीडिया. त्याचबरोबर फोन, इंटरनेट, पेट्रोल आणि एनर्जी संबंधीत बाबी वगळल्या आहेत. तसेच वेअर हाऊसिंग, आयटी आणि आयटीईएस क्षेत्रालाही यातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, या सर्वांसाठी लागणारे ट्रक आणि मनुष्यबळ यांना विशिष्ट पास देण्यात येतील त्यांच्या गाड्यांना स्टिकर्स लावण्यात येतील.
आजच्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर दोन आदेश काढण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या आदेशात आजच्या जनता कर्फ्यूचा कालावधी उद्या पहाटे ५ वाजण्यापर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ३१ तारखेपर्यंत दुसरा जमावबंदी आदेश काढण्यात येणार आहे. अशी माहिती टोपे यांनी दिली.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.