हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अमदाई व्हॅली कॅम्पमध्ये छत्तीसगड सशस्त्र दलाच्या जवानांमध्ये वाद झाला. या वेळी एका जवानाने गोळीबार केला. या घटनेत सीएएफच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. आमदाई व्हॅली कॅम्पमध्ये सैनिकांमध्ये भांडणे झाली. यावेळी झालेल्या हाणामारीत एका जवानानं आपल्या साथीदारांवर गोळीबार केला. सीएएफ ९ या बटालियनच्या जवानाने गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.
या गोळीबारात दोन जवान ठार झालेत तर एक जवान जखमी झाला आहे. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. हे चोथेडोंगर पोलिस ठाण्याचे प्रकरण आहे. गोळीबार करणाऱ्या या आरोपी जवानचे नाव घनश्याम कुमेती असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी या गोळीबारात रामेश्वर साहू आणि बिन्तेश्वर साहनी हे दोघे जवान ठार झालेत तर लच्छू राम जखमी झाले आहेत. या जखमी जवानला रायपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चोथेडोंगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी या आरोपी जवानला अटक केली आहे. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी या प्रकरणाची खातरजमा केली आहे. सीएफ -९ या बटालियन डी कंपनीच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी या आरोपी जवानने आपल्या साथीदारांवर गोळीबार केला.
या घटनेआधीही सुमारे ६ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची एक घटना ओरछाच्या काडेनर येथील आयटीबीपीच्या छावणीत घडली होती. त्यावेळीही एका जवानाने त्याच्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात ६ सैनिक ठार झाले तर गोळीबार केल्यावर आरोपी जवानने स्वत:वरही गोळी झडून घेतली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.