‘द डार्क नाइट राईझेस’अभिनेता जे बेनेडिक्टचे कोरोनाव्हायरसमुळे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांला आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. दरम्यान हॉलिवूड अभिनेता जे बेनेडिक्ट यांचा करोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

६८ वर्षीय बेनेडिक्ट हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेते होते. बेनेडिक्ट यांच्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार त्यांना २८ मार्च रोजी करोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अखेर सात दिवसांच्या प्रयत्नानंतर चार मार्चला त्यांची प्राणज्योत मालवली.

जे बेनेडिक्ट हे हॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत ‘द रशियन हाऊस’, ‘सेव्हिंग ग्रेस’, ‘पेज लाईट’, ‘हॉस्टेल’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘एलियन’ आणि ‘बॅटमॅन: द डार्क नाईट राईझेस’ या दोन चित्रपटांनी त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांनी काही ऍनिमेटेड चित्रपटांना आपला आवाजदेखील दिला होता. जे बेनेडिक्ट यांच्या मृत्यूमुळे हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाव्दारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘द डार्क नाइट राईझेस’अभिनेता जे बेनेडिक्ट यांचे कोरोनाव्हायरसमुळे निधन झाले आहे, अशी माहिती त्याच्या व्यवस्थापन टीमने जाहीर केले.कंपनीने शनिवारी ट्वीट केले की, “आम्हांला सांगताना दु: ख होते आहे की आमचा प्रिय क्लायंट जे बेनेडिक्टचे निधन झाले आहे.या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासमवेत आहोत.

त्यांच्या ‘इमरडेल’मधील सहकलाकार विकी मिशेल यांनी एका ट्विटमध्ये श्रद्धांजली वाहिली.

 

“आमच्या सर्वात प्रतिभाशाली अभिनेत्यापैकी एक दयाळू आणि प्रेमळ माणूस, जे बेनेडिक्ट आपल्यातून निघून गेलेला आहे हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. माझी प्रेमळ मैत्रिणी फोबी स्कोल्डफील्डशी त्याने लग्न केले. या दुःखदवेळी मी तिच्या आणि तिच्या कुटूंबियांसमवेत आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.