हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. “माझ्यावरही खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु आहे. हे सरकार सरकारपेक्षा एखाद्या गँगस्टरसारखे वागत आहे. विरोधक विरोध करणार हे लोकशाहीत अभिप्रेत असतं. असे अटक करून आणि धमक्या देऊन काही होतं नसते,” अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून ट्विटमधून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहार. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केलेले ट्वीट आणि दिलेल्या घोषणा याचे कारण देत अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रातोरात ते दखलपात्र करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आलेले आहेत. हे सरकार सरकारपेक्षा एखाद्या गँगस्टरसारखे वागत आहे.
हे सरकार सरकारपेक्षा एखाद्या गँगस्टरसारखे वागत आहे. विरोधक विरोध करणार हे लोकशाहीत अभिप्रेत असतं. असे अटक करून आणि धमक्या देऊन काही होतं नसतं.
माझ्यावर पण खोट्या गुन्ह्याची तयारि सुरु केली आहे.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 22, 2022
विरोधक विरोध करणार हे लोकशाहीत अभिप्रेत असतं. असे अटक करून आणि धमक्या देऊन काही होतं नसतं. माझ्यावर पण खोट्या गुन्ह्याची तयारी सुरु केली आहे. 8 पोलीस स्टेशनमध्ये आनंद परांजपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल. म्हणजे सरकार विरुद्ध बोलणं ही काय अतिरेकी कारवाई झाली कि काय? ब्रिटिश विरोधकांचा आवाज बंद नाही करू शकले. तर अशा गुन्ह्यांनी लोकांचे आवाज कसे शांत करणार. विरोध तर होणारच आणि विरोध तर करणारच, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.