“..तर मी आत्महत्या करणार”; जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील महाविकास आघाडीचेअनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. आघाडीतील अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड महत्वाचे विधान केले. “माझ्या मुलीला मी आता महाराष्ट्रात ठेवणार नाही, जर माझ्या मुलीला ईडीचं बोलावणं आलं तर मी आत्महत्या करेन,” असे वक्तव्य आव्हाड यांनी केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, तपास यंत्रणांचा वापर करुन राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर वरिष्ट पातळीवर चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत माझ्या मुलीला मी आता महाराष्ट्रात ठेवणार नाही, जर माझ्या मुलीला ईडीचं बोलावण आलं तर मी आत्महत्या करेन.

राज्याने कुणावर कधी अशी सूडबुद्धीन कारवाई केली नाही, कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे. केंद्र सरकारकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सुडबूद्धीने कारवाई केली जात असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Leave a Comment