जळगाव : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरू आहे. यादरम्यान आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट कर्नाटकचा भाग असल्याचे म्हंटले आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.
एकनाथ खडसेंचा निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा विषय बाजूला सारण्यासाठीच भाजप बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या वक्तव्याचा लाभ करून घेत आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात येत आहे. भगतसिंग कोश्यारींचा विषय वळवून घेण्यासाठी बोम्मई सारख्यांकडून वक्तव्य समोर येत असल्याचं खडसे यावेळी म्हणाले.
नेमके काय ,म्हणाले बोम्मई?
‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे. तसेच या प्रकरणी 2004 पासून सर्वोच्च न्यायालयात जो खटला सुरु आहे त्याला अद्याप यश आले नाही. या प्रकरणी कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत’, असे ट्विट बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्याकडून करण्यात आले आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती