हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर केरळने राबविलेल्या उपाययोजना या सर्वासाठी आदर्श म्हंटल्या जातात. अत्यंत कमी वेळात राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यात केरळ प्रशासनाला यश आले आहे. देशभरात झपाट्याने हा विषाणू वाढत असतानाच यावर नियंत्रण मिळविण्यास केरळला यश आले आहे. आता केरळमध्ये आणखी एक यशस्वी घटना घडली आहे. राज्यातील १३ लाख विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा घेण्यात केरळ प्रशासनाला यश आले आहे.
इतर राज्यांमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असतानाच, जनजीवन सुरळीत करण्याबरोबरच सरकारने परीक्षादेखील घेतल्या आहेत. आणि यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला धोका पोहोचलेला नाही. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून ही माहिती दिली आहे. “१४ दिवसांपूर्वी १३ लाख विद्यार्थ्यांनी केरळमध्ये अंतिम परीक्षा पूर्ण केल्या आहेत. एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचे निदान झालेले नाही. अत्यंत सावधरीत्या याचे नियोजन करण्यात आले होते. सर्वांना मास्क देण्यात आले होते. शारीरिक तापमान तपासणे बंधनकारक करण्यात आले होते. भौतिक अंतराची खात्री करण्यात आली होती. ऑपरेशन यशस्वी झाले आहे.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
14 days ago 13 lakh school students completed school final exams in Kerala. Not a single student affected by Covid. It was meticulously planned: schools sanitised. Masks distributed to all. Thermal readings mandatory. Physical distancing ensured. Operation success.#covidkerala
— Thomas Isaac (@drthomasisaac) June 15, 2020
करोनामुळे शैक्षणिक सत्राची सुरूवात करण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. केंद्रीय मनुष्य मंत्रालयानं शाळा सुरू करण्याबाबत नियोजन केले आहे. मात्र, गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळाल्याशिवाय शाळा सुरू करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे अनेक राज्यात करोनाचा प्रसार वाढला असून, शैक्षणिक सत्र सुरू होण्यास विलंब होणार असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने आवश्यक सावधिगिरी बाळगण्याच्या सूचना देत शैक्षणिक सत्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र ज्या ठिकाणी रेड झोन आहे तिथे शाळा-महाविद्यालये सुरु करण्यास मनाई करण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.