महाविकास आघाडीच्या विराट मोर्च्यात पैशांचे वाटप; भाजप नेत्याचा खळबळजनक व्हिडीओ ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत विराट महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात आघाडीतील सर्व मोठे नेते सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने मोर्च्यात लोक सहभागी झाल्यामुळे भाजपकडून आता संशय व्यक्त केला जात आहे. या दरम्यान आता भाजपच्या एका नेत्याने थेट एक खळबळजनक व्हिडीओ ट्विट करत आजच्या महाविकास आघीच्या मोर्च्यात पैशांचे वाटप करण्यात आल्याचा दावा देखील केला आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी नुकताच एक व्हिडीओ ट्विट केला असून त्या व्हिडिओतून त्यांनी मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयाजवळ आज मोर्चा सुरू असतानाचे दृश्य दाखवले आहेत. या दृश्यात मोर्च्यात लोकांना एक व्यक्ती पैसे वाटत असल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओवरून केशव उपाध्याय यांनी महाविकास आघाडीच्या वतीनेच आजच्या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी लोकांना पैशांचे वाटप करण्यात आले असावे, असा दावा देखील केला आहे. तसेच त्यांनी आज मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुध्दा अशा पध्दतीने असे देखील म्हंटले आहे. त्यांच्या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नैतिकतेच्या गोष्टी कशाच्या आधारावर मारतात?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते यांनी मोठा खटाटोप केला. सगळ्यांनी एकत्र येऊन आपण राज्याच्या राजधानीत काहीतरी वेगळं करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्ष मोर्चात फार तुरळक गर्दी होती. ती आपण सगळ्यांनी पाहिली. तसेच पैसे वाटून तुरळक गर्दी आणली असेल तर ते नैतिकतेच्या गोष्टी कशाच्या आधारावर मारतात?,अशी टीका केशव उपाध्याय यांनी केली.