हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर गेल्या अनेक दिवसापासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “अजित पवारांचा जरंडेश्वर कारखाना जप्त झाला आहे. डझनभर पवार लाईनमध्ये रडत होते. बेनामी संपत्ती प्रकरणी अजूनही अजित पवारांवर चौकशी सुरू,” असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.
किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जरंडेश्वर कारखाना जप्त झाला आहे. डझनभर पवार लाईनमध्ये रडत होते. बेनामी संपत्ती प्रकरणी अजूनही अजित पवारांवर चौकशी सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. उके महाराष्ट्राला लुटत होते. माफियागिरी करत आहे. ईडीने सर्च केला कारवाई केली पण काहीतरी केले म्हणून बाहेर येते आहे हे नक्की.
वास्तविक उके यांनी माझ्या विरोधात पण त्यांनी वकीलपत्र घेतले होते. पण वकीलपत्रामुळे कोणावर कारवाई होत नाही. कारवाई होत असेल तर घोटाळा केला हे नक्की, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.