किसनवीर निवडणूकि विजयानंतर शशिकांत शिंदेंनी दिली महेश शिंदेंना वॉर्निंग; म्हणाले…

kisanveer sugar factory election result
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा निकाल लागला असून यामध्ये माजी आमदार मदनदादा भोसले यांचा राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू नितीनकाका पाटील यांनी केलाय. (Kisanveer Sugar Factory Election Result) यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीये. सातारा जिल्हा किसनवीर, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचाराने चालणारा जिल्हा आहे. हा बारामतीचा फेरा आहे. बारामतीच्या नादाला लागू नका नाहीतर संपून जाल असा हल्लाबोल आ. शशिकांत शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांचे नांव न घेता केला.

किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला असून सभासदांनी आणि शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार आणि कारखाना चालवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली. काही लोक अपघाताने आमदार झाले. त्यांनी मस्तीमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये टीकेची पातळी सोडून ज्या पद्धतीने प्रचार केला त्याला मतदाराने चोखपणे उत्तर दिले आहे असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. (kisanveer sugar factory election result).

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/491526052669705

यावेळी बोलताना, सातारा जिल्हा किसनवीर, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचाराने चालणारा जिल्हा आहे. बारामतीच्या नादाला लागू नका हा बारामतीचा फेरा आहे संपून जाल असं म्हणत महेश शिंदे यांना बजावलं आहे. फार काळ सत्तेची धुंदी चालत नाही आणि ती जागा मतदारांनी दाखवून दिली आहे असं म्हणत आगामी काळातही असाच निकाल लागेल असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदेंना विधानसभा निवडणुकीतहि तुमचा पराभव होणार असल्याचं म्हटलं आहे.

कार्यकर्ते घोडे घेऊन नाचत असून गर्वाने गर्वहरण करेल याची मला खात्री आहे. येत्या काळात हा परिणाम निश्चितपणे पाहायला मिळेल. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सातारा जिल्हा आहे हे या निवडणुकीतून दाखवून दिले आहे अशी टीका आमदार महेश शिंदेंवर केलीये.

हे पण वाचा –

किसनवीर कारखान्यांत अखेर सत्तांतर : आबा, काकांची जादू चालली तर मदन भोसले, आ. महेश शिंदेंचे पानिपत

हवा भरताना JCB चा टायर फुटला, दोघांचा मृत्यू; CCTV व्हिडिओ पहा

RBI चा मोठा निर्णय! तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? कर्ज महागणार, EMI वाढणार अन बरंच काही…

Malabar Neem Tree : शेतकऱ्यांनो चिंता सोडा; ‘या’ झाडाची लागवड करा अन् 6 वर्षांत करोडपती व्हा

PM Kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या