हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अधिवेशनातील चर्चेवेळी राज्य सरकारने राबविलेल्या इ पीक पाहणीच्या उपक्रमावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर टीका केली. राज्यात ई पीक पाहणीचा अतिशय चांगला उपक्रम आहे. मात्र, इ पीक पाहणीच्या उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. यावर पर्याय म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मसोबत राज्य सरकारने एक करार करावा आणि सहा जिल्ह्यात ज्या प्रमाणे ड्रोनद्वारे पीक नुकसानीची पाहणी केली. त्याप्रमाणे संपूर्ण राज्यात पाहणी करावी. मात्र, ड्रोन द्वारे पीक पाहणीचा प्रयोग राज्य सरकार महाराष्ट्रात करणार का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
मुंबईत आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनास सुरुवात झाली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस ई पीक पाहणीच्या मुद्यावरून राज्य सरकावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात ई पीक पाहणीचा अतिशय चांगला उपक्रम आहे. मात्र, राज्य सरकारने केलेला हा प्रयोग हा उपयोगाचा नाही. यापेक्षाही चांगला असलेला ड्रोनदवारेचा पीक पाहणीचा प्रयोग चांगला होऊ शकतो.
https://www.youtube.com/watch?v=BA00tfyyqz8
पीक पाहणीच्या उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. त्यामुळे शेतकऱ्याना त्रास होऊ नये यासाठी ई पीक पाहणी ऐवजी ड्रोन द्वारे पीक पाहणीचा प्रयोग राज्य सरकार महाराष्ट्रात करणार का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिले. इ पीक पाहणीचा वापर हा राज्यातील शेतकऱयांकडून केला जात आहे. शेतकरी आता अँड्रॉईड फोन वापरत आहेत. त्यांना पिकांचे नुकसान हे पीक पाहणीच्या एअपद्वारे बघणे शक्य झाले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ई पीक पाहणीचा प्रयोग हा चांगल्या पद्धतीने होत असल्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले.




