नवी दिल्ली । LIC वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवंनवीन योजना आणत असते. कंपनीने यावेळीही ग्राहकांसाठी नवीन जीवन शांति डिफर्ड एन्युइटी योजना (New Jeevan Shanti deferred annuity plan) आणली आहे. 21 ऑक्टोबर 2020 पासून आपण ही योजना ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही खरेदी करू शकता. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, एकल प्रीमियम, डिफर्ड एन्युइटी योजना आहे. LIC च्या या योजनेत ग्राहकांना कर्जाची सुविधादेखील मिळणार आहे.
LIC ने (Life Insurance Corporation) निवेदनात म्हटले आहे की, या नवीन जीवन शांती पॉलिसीच्या वार्षिक दराची हमी पॉलिसीच्या सुरूवातीसच दिली जाते. या पॉलिसीबद्दल तपशीलवार जाणून घेउयात-
पॉलिसीचा पहिला पर्याय
या योजनेतील पहिला पर्याय म्हणजे सिंगल लाइफसाठी डिफर्ड एन्युइटी हा आहे. या पर्यायामध्ये, डिफरमेंट कालावधीनंतर एन्युइटी पेमेंट एन्युइटी घेणाऱ्याचे आयुष्य सुरु आहे तोपर्यंत चालू राहील. जर वार्षिकी एन्युइटी घेणाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर अशा स्थितीत नॉमिनी व्यक्तीला त्याचा लाभ मिळेल.
पॉलिसीचा पॉलिसी पर्याय
सिंगल लाइफ व्यतिरिक्त, जॉईंट लाइफसाठी आपल्याला डिफर्ड एन्युइटी मिळू शकते. यात, डिफरमेंट कालावधीनंतर एन्युइटी पेमेंट पहिला किंवा दुसरा व्यक्ती जिवंत असेपर्यंत चालूच राहील. डिफरमेंट अवस्थेमध्ये जर दोघांचा मृत्यू झाला तर ते नॉमिनी व्यक्तीला दिले जातील.
जॉईंट लाइफ एन्युइटी कोण घेऊ शकेल?
जॉईंट लाइफ एन्युइटी केवळ एका कुटुंबातील दोन लोकांमध्ये घेतली जाऊ शकते उदा. आजी-आजोबा, आई-वडील, दोन मुले, दोन नातवंडे, पती किंवा पत्नी किंवा भावंडे.
1,50,000 रुपये खर्च करावे लागतील
ही योजना खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 1,50,000 रुपये गुंतवावे लागतील. आपण वार्षिक, 6 महिने, 3 महिने आणि मंथली मोडमध्ये घेऊ शकता. हे खरेदीदारास कोणता मोड घ्यायचा आहे यावर अवलंबून आहे. या योजनेत किमान वार्षिक उत्पन्न 12,000 रुपये आहे. जास्तीत जास्त खरेदी किंमतीची मर्यादा नाही.
कोण योजना घेऊ शकते ?
लोक 30 वर्ष ते 79 वर्षांपर्यंत कोणतीही व्यक्ती ही योजना घेऊ शकतात.
डेफरमेंट कालावधी किती आहे
यामध्ये किमान कालावधी एक वर्ष आणि जास्तीत जास्त कालावधी 12 वर्षे असेल.
इंसेंटिवही मिळेल
या योजनेंतर्गत पाच लाख आणि त्याहून अधिक किंमतींच्या खरेदी किंमतीवरही इंसेंटिव मिळू शकेल. हे प्रोत्साहन एन्युइटी रेट वाढीच्या स्वरूपात असेल. अपंग लोक ही योजना 50,000 रुपयात खरेदी करू शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.