हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारची पंतप्रधान वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) ही भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) चालवते. ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांसाठी केंद्र सरकारकडून अनुदानित ही एक नॉन-लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपेटिंग स्कीम आहे. अलीकडेच वित्त मंत्रालयाने तिचा कालावधी तीन वर्षांसाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविला आहे. या योजनेंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ७.४० टक्के दराने व्याज दिले जाईल. या निवृत्तीवेतन योजनेंतर्गत १० वर्षासाठी दरमहा सुमारे १० हजार रुपये पेन्शनची हमी मिळते.
सरकारने या योजनेचा कालावधी दुसऱ्यांदा वाढविला आहे
सुरुवातीला, केंद्र सरकारने ही योजना अल्प कालावधीसाठी सुरु केली होती, त्यानंतर ती ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आली. आता पुन्हा एकदा या योजनेचा कालावधी ३१ मार्च २१२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे. एलआयसीने या योजनेबद्दल सांगितले की, पुढील दोन आर्थिक वर्षांसाठी वर्षाच्या सुरूवातीस अर्थ मंत्रालय पीएमव्हीव्हीवायवरील व्याज दराचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेईल.
या योजनेचे काय फायदे आहेत?
या योजनेचा कालावधी १० वर्षे असेल. तुम्हाला १० वर्षे पूर्ण करूनही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पुन्हा ही योजना घ्यावी लागेल. जर या योजनेच्या १० वर्षापर्यंत पेंशनधारक टिकून असेल तर, निवृत्तीवेतनाचा कोणता कालावधी निवडला गेल्यानंतर थकबाकी देण्यात येईल.
डेथ बेनिफिटचा देखील फायदा
या योजनेची मुदत पूर्ण होण्यापूर्वी पेंशनधारकाचा मृत्यू झाल्यास याची रक्कम ही लाभार्थ्याला परत केली जाईल. त्याच वेळी, या पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर पेंशनधारक जिवंत जर जीवंत असेल, तर यासाठी त्यांना या पॉलिसीच्या अंतिम पेन्शन इन्सटॉलमेंटसह खरेदी रक्कम देण्यात येईल.
पात्रता काय आहे?
६० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही ज्येष्ठ नागरिक या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेऊ शकेल. या योजनेसाठी वयाची कमाल मर्यादा नाही.
>> ही योजना एलआयसीकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन देखील खरेदी केली जाऊ शकते.
>> चालू आर्थिक वर्षात या योजनेवरील व्याज दर वार्षिक ७.४०% राहील. अशा परिस्थितीत जर तुम्ही यंदा गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी ७.४० टक्के दराने व्याज मिळेल.
>> यामध्ये तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन मिळण्याचा पर्याय उपलब्ध असेल. आपण आपल्या गरजेनुसार योग्य तो पर्याय निवडू शकता.
>> या योजनेत गुंतविलेल्या रकमेवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा किमान १ हजार रुपये पेन्शन मिळू शकते. मात्र, आपण हे लक्षात घ्यावे लागेल की,या योजनेंतर्गत दरमहा जास्तीत जास्त पेन्शन ९,२५० रुपये असेल.
लोन देखील उपलब्ध आहे
काही विशेष प्रकरणांमध्ये या योजनेत प्रिमॅच्युअर विड्रॉलही उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेणार्या व्यक्तीला किंवा त्यांच्या जोडीदारास कोणत्याही गंभीर आजारासाठी ही सुविधा मिळते. मात्र, अशा परिस्थितीत केवळ खरेदी किंमतीचे ९८% सरेंडर मूल्य परत केले जाते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तीन वर्षानंतर लोनची सुविधा देखील उपलब्ध आहे. लोनची रक्कम खरेदी किंमतीच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.