LIC IPO Date : तुम्हीसुद्धा LIC चा IPO घेण्याचा विचार करत आहात काय? सर्व महत्वाची माहिती फक्त 2 मिनिटांत जाणुन घ्या

LIC IPO Date
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पैसापाण्याची गोष्ट । लाइफ इन्शुरन्स (LIC IPO Date) हे भारताच्या इन्शुरन्स मार्केटमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रापैकी एक आहे. याचाच फायदा घेत पुढील आठवड्यात प्रायमरी मार्केटमध्ये LIC चा IPO येणार आहे. BSE वेबसाइटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, LIC IPO चे सबस्क्रिप्शन 4 मे 2022 रोजी सुरु होईल. यानंतर 9 मे 2022 पर्यंत त्यासाठी बोली लावता येणार आहे. हा ₹ 21,008.48 कोटी किंमतीचा पब्लिक इश्यू असेल. यामध्ये 100 टक्के शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे दिले जातील. भारत सरकारकडून (GoI) त्याचा प्राईस बँड ₹902 ते ₹949 प्रति इक्विटी शेअर निश्चित केला आहे. LIC चे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ₹92 च्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत.

IPO आणखी आकर्षक बनवयचा LIC चा प्रयत्न आहे. त्यांचे अंदाजे 30 कोटी पॉलिसीधारक आणि 13 लाख एजंट आहेत. त्यांचा एकूण एजंट नेटवर्कच्या 55 टक्के वाटा आहे. 2021 मध्ये या क्षेत्राच्या एकूण विमा प्रीमियम्सपैकी LIC चा सुमारे मार्केटमधील वाटा 64% आहे. FY20 मध्ये त्याचे प्रीमियम उत्पन्न 5.7 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त आहे. यापैकी LIC ने सुमारे 3.8 ट्रिलियन रुपये इतके प्रीमियम होते.

LIC च्या IPO चे काही ठळक मुद्दे जाणून घेउयात.. (LIC IPO Date)

LIC IPO डेट : पब्लिक इश्यू 4 मे 2022 रोजी उघडेल आणि 9 मे 2022 पर्यंत बोलीसाठी खुला राहील.

LIC IPO प्राईस : भारत सरकारने LIC IPO चा प्राईस बँड ₹902 ते ₹949 प्रति इक्विटी शेअर निश्चित केला आहे.

LIC IPO साईज : या पब्लिक इश्यूमधून भारत सरकार ₹21,008.48 कोटी उभे करणार आहे.

LIC IPO लॉट साईज : या IPO च्या एका लॉटमध्ये 15 शेअर्स असतील. यासाठी बोलीदार लॉटमध्ये अर्ज करू शकतील.

LIC IPO ऍप्लिकेशन लिमिट : एक बोलीदाराला किमान 1 लॉटसाठी अर्ज करता येईल तर सिंगल बिडरसाठी अर्ज करण्यासाठी जास्तीत जास्त 14 लॉटची परवानगी आहे.

LIC IPO डिस्काउंट : सरकारने ‘पॉलिसीधारक’ या कॅटेगिरी अंतर्गत अर्ज करणार्‍या IPO अर्जदारांसाठी ₹60 प्रति इक्विटी शेअर डिस्काउंट आणि ‘कर्मचारी’ कॅटेगिरी अंतर्गत अर्ज करणार्‍या बोलीदारांसाठी ₹45 प्रति इक्विटी शेअर डिस्काउंट जाहीर केला आहे.

LIC IPO अलॉटमेंट डेट : शेअर अलॉटमेंटच्या घोषणेची तारीख 12 मे 2022 आहे.

LIC IPO लिस्टिंग : LIC चे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट होतील. या शेअर लिस्टिंगची संभाव्य तारीख 17 मे 2022 आहे.

LIC IPO रजिस्ट्रार : KFin Technologies Limited हे LIC IPO चे अधिकृत निबंधक आहेत.

LIC IPO साठी इन्व्हेस्टमेंट लिमिट : एक बोलीदार किमान एक लॉट तर जास्तीत जास्त 14 लॉटसाठी अर्ज करू शकेल, या IPO साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गुंतवणुकीची लिमिट ₹14,235 (₹949 x 15) आहे तर कमाल गुंतवणुकीची लिमिट ₹1,99,290 [( ₹949 x 15) x 14] इतकी आहे. LIC IPO Date

LIC IPO: खरेदी करावा की नाही?

LIC IPO विषयी माहिती घ्यायची झाली तर 6 लाख कोटींचे मुल्यांकन असलेल्या या इश्यूची प्राईस 1.1 च्या एम्बेडेड व्हॅल्यू पर्यंत आहे. LIC ची ब्रँड व्हॅल्यू जास्त आहे. तसेच LIC आपल्या एजंट्सच्या मोठ्या नेटवर्कमुळे प्रचंड स्पर्धात्मक फायदा मिळवतो. मात्र, खाजगी कंपन्यांकडून बाजारातील हिस्सा गमावणे, त्यांच्या तुलनेत कमी नफा आणि महसूल वाढ असणे, तसेच कमी VNB मार्जिन आणि अल्प-मुदतीचे सातत्य गुणोत्तर यासारख्या चिंता कंपनीला सतावत आहेत. इन्शुरन्स बिझनेस हा लॉन्ग टर्म आहे. त्यामुळे त्यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याची शिफारस तज्ञ करतात. LIC IPO Date

हे ही वाचा –

LIC IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO बद्दल 15 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

LIC IPO: जर तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर आधी कंपनीविषयीची जाणून घ्या

LIC IPO: जर आपल्याकडे LIC ची पॉलिसी असेल स्वस्तात मिळतील शेअर्स

PPF आहे खूपच कामाची गोष्ट, कर्जही मिळतं अन टॅक्स मध्ये सूटदेखील; जाणून घ्या या 10 गोष्टी

Maruti Suzuki Car Price | मारुतीने बदलल्या सर्व 9 गाड्यांच्या किंमती; चेक करा कोणती गाडी किती रुपयांना?