महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा; दिग्गज नेतेमंडळी रस्त्यावर उतरणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी कडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या कारणांमुळे महाविकास आघाडी कडून मोर्चा पुकारण्यात आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेतेमंडळी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे.

या महामोर्चामध्ये ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, अरविंद सावंत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह नेते उपस्थित असणार आहेत. तसेच, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असणार आहेत.

कोणकोणते पक्ष मोर्चात सहभागी होणार?

शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
समाजवादी पक्ष
भारतीय कम्युनिष्ट पक्ष
मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष
शेतकरी कामगार पक्ष
भीमशक्ती रिपब्लिकन