मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाचे नेते पक्ष सोडून जाऊ लागल्याने व्यथित झाले आहेत. मात्र या राजकीय खेळीचा बदला घेण्यासाठी शरद पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. शरद पवार स्वतः संपूर्ण राज्याचा दौरा करून लोकांना सरकराने अपयश दाखवून देणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांना चितपट करण्यासाठी शरद पवार हे विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात शिवस्वराज्य यात्रा घेऊन निघाले आहेत. त्यांच्या यात्रेला लोकांचा खूप प्रतिसाद आहे असे मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत. त्याच्या या यात्रेला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात काढली आहे. त्याच अमोल कोल्हे देखील सरकारवर तुटून पडले आहेत. अशात पुढच्या आठवड्यात शरद पवार देखील यात्रा काढून अपयशाचा पाढा जनते पुढे वाचणार आहेत.
पुढील आठवड्यातच विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सर्वच राजकीय पक्ष आपले मुद्द्ये जनतेपुढे मांडण्याची चढाओढ करत आहेत. या मध्ये राष्ट्रवादी आणि भाजप अत्यंत आघाडीवर आहे. त्याच प्रमाणे शिवसेना देखील मतदारपर्यंत पोचण्यात यशस्वी झाली आहे. सेने भाजपच्या युतीची बोलणी पूर्णत्वाला गेली असून काही दिवसातच युतीचे जागा वाटप देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष निवडणुकीला सज्ज झाले आहेत असे म्हणावे लागणार आहे.