मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात आला नसून राज्यातील को रोनाबाधित रुग्णांची संख्या ६ हजार ८१७ वर पोहोचली आहे. शुक्रवारी राज्यात करोनाचे ३९४ नवे रुग्ण आढळले असून १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ३१० झाली असून ९५७ जणांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेलं आहे.
तर दुसरीकडे कोरोना संसर्गाचे केंद्रबिंदू बनलेल्या मुंबईत २४ तासांत ३५७ आणखी करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ५८९ वर गेली आहे. शुक्रवारी ११ जणांचा या कोरोना आजाराने बळी गेला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १७९ वर गेली आहे.
394 new positive cases & 18 deaths reported in Maharashtra in the last 24 hours. The total number of positive cases in the state rises to 6817, including 301 deaths: Maharashtra Public health department #COVID19 pic.twitter.com/vKkKiOqTyP
— ANI (@ANI) April 25, 2020
शुक्रवारी देशभरात नव्या १७५२ रुग्णांची भर पडली असून ही देशात एक दिवसात नोंदविण्यात आलेली सर्वात मोठी संख्या आहे. देशातील संख्या 24 हजार 506 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 18 हजार 668 रुग्ण, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 5 हजार 063 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 775 जणांचा आकडा समाविष्ट आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”