हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर भूमिका घेत महामुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर ही मोठी शहरे बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता राज्यातील पहिली ते आठवी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
दरम्यान, नववी व अकरावीचे उर्वरित पेपर १५ एप्रिलनंतर होणार आहेत. दहावीचे उरलेले पेपर मात्र वेळापत्रकानुसारच होतील, असं गायकवाड यांनी सांगितलं. दहावीचे शिक्षक सोडून इतर सर्व शिक्षकांनी घरूनच काम करावे, अशा सूचनाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –
करोनाविरुद्धच्या लढाईत बॉलीवूडकर आले समोर; पहा व्हिडिओ..
कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका – मुख्यमंत्री ठाकरे
जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
व्हिडिओ: ऐका हो! करोना पोवाडा..कोल्हापूरच्या शाहिराचा अनोखा जनजागृती पोवाडा
लोकलच्या गर्दीत केवळ ३० टक्के घट; लोकल बंद करण्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा