सातारा | राज्यात सध्या लोकशाही सरकार नसून ठोकशाही सरकार आहे,अशा कडक शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यमान सरकारवर निशाणा साधला आहे. आज साताऱ्यात राज्यसभा खासदार उदयराजे भोसले यांच्यासोबच चंद्रकांत पाटील यांनी अजिंक्यतारा या किल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत ठाकरे सरकारवर टीका केली.
पाटील पुढे म्हणाले की ” राज्यातील अनेक नामांकित व्यक्तींना गुन्हे दाखल करून बदनाम करण्याची भीती दाखवली जाते आहे.त्यामुळे मला कधी – कधी प्रश्न पडतो की हे सरकार लोकशाही सरकार आहे की ठोकशाही सरकार आहे. पण सत्ताधाऱ्यांनो एक बाब सतत लक्षात असू द्या की, लोकं मतदानाची वाट पाहत आहेत.
लोकांनी खरी सत्ता ही भाजपच्या हातात दिली होती पण तूम्ही आकड्यांचे खेळ खेळून यशस्वी झालात. आता मात्र जनता शांत बसणार नाही. येत्या निवडणुकीत तुम्हाला नक्कीच जनता घरी बसवेल असा आशावाद देखील पाटील यांनी व्यक्त केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.