मुंबई प्रतिनिधी | भारिप-बहूजन महासंघ आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाऊद इब्राहीम प्रकरणाचा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केला.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम स्वत: शरण येऊन समर्पण करणार होता. मात्र या प्रस्तावाकडे शरद पवारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप, प्रकाश आंबेडकर यांनी केला. दाऊद इब्राहिमने शरण येऊन समर्पण करण्याचा प्रस्ताव त्याने ज्येष्ठ वकील राम जेठमलानींद्वारे दिला होता, या प्रस्तावाकडे शरद पवारांनी दुर्लक्ष का केलं ते स्पष्ट करावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शरद पवार यांनी जेठमलानी यांची ऑफर का नाकारली याचा खुलासा करावा. हे सर्व मिलीभगतची सरकार आहे. मोदी हे शरद पवारांच्या घरी का जातात? मोदींना माहीत नाही का शरद पवार यांनी दाऊदला सरेंडर करून घेतलं नाही? असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत.
इतर महत्वाचे –
नांदेडमधून अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढणार…
गोव्याचे नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत