सेना नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून भाजप महाराष्ट्रद्रोही का?- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

पुणे । शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी समजू नये, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. आम्ही पण महाराष्ट्रातीलच नेते आहोत, आम्हालाही राज्याच्या अस्मितेचे भान आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला … Read more

‘त्या’ अनुभवानंतर राज्यपाल आता पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांनी चोळलं जखमेवर मीठ

पुणे । गतवर्षी संबंध महाराष्ट्र साखर झोपत असताना अजित पवार यांना हाताशी धरुन भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला आज १ वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकासघाडीतील नेत्यांनी शपथविधीच्या आठवणींना उजाळा देत एकप्रकारे भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत मिश्किल टिप्पणी केली. त्या अनुभवानंतर राज्यपाल … Read more

नीता ढमालेंनी कसली पुणे पदवीधर निवडणूक जिंकण्यासाठी कंबर

पुणे प्रतिनिधी | पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या नीताताई ढमाले यांनी जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ढमाले बोलत होत्या. “पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही राजकीय पक्षांना बळकटी देण्यासाठी नसून पदवीधरांच्या कल्याणासाठी आहे. म्हणूनच मी पदवीधरांसाठी विधायक कामे करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. महिलांना राजकीय आरक्षण दिले पाहिजे, … Read more

फडणवीस उठाबशा काढत असतील तर आम्ही त्यांना चितपट करू! जयंत पाटलांचे थेट आव्हान

पुणे । “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती झालं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यांना आम्ही चितपट करणार आहोत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाचही जागांवर महा विकास आघाडीचाच विजय होईल” असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. पुण्यात महाविकास आघाडीने पत्रकार परिषद … Read more

खळबळजनक! अजित पवारांच्या शेजाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं

पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील शेजाऱ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं असल्याने खळबळ माजली आहे. मृत व्यक्तीच्या मुलाने या संदर्भात बारामती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांना अटक केली आहे तर अद्याप ३ जण फरार आहे. मिळलेल्या माहितीनुसार, व्यापारी प्रीतम … Read more

पदवीधर निवडणुक: भाजपाला लागलं नाराजीचं ग्रहण! आणखी एक मित्रपक्ष दुखावल्याने वाढली डोकेदुखी

पुणे । विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र निवडणुकीआधीच भाजपाच्या मागे डोकेदुखी वाढत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला होता, परंतु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने सदाभाऊ खोत यांची समजूत काढण्यात यश आलं. पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीतून … Read more

‘राज्यात पुन्हा निवडणूक घेतल्यास आम्हीचं निवडून येऊ’; चंद्रकांत पाटलांचा दृढ विश्वास

पुणे । बिहार निवडणुकीत भाजपाचा विजय मिळाल्यावर राज्यातील भाजप नेत्यांनाही पुन्हा एकदा सत्तेत येण्याची स्वप्न पडत आहेत. ‘राज्यात पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असा विश्वास भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. मी भविष्यकार नाही, आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, असं म्हणत … Read more

बिहार निवडणुक निकालांवरून फडणवीसांना शरद पवारांचा टोला, म्हणाले…

पुणे । बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रभारी म्हणून काम पाहिलं. बिहारमधील भाजपच्या यशात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिली आहे. त्याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी विचारलं असता, “हो का? हा चमत्कार आपल्याला माहिती नव्हता. फार चांगली गोष्ट सांगितली तुम्ही” अशा शब्दात पवारांनी … Read more

‘प्रतिकूल परिस्थितीत तेजस्वी यादवांनी चांगली लढत दिली’; बिहार निवडणुकीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे । “बिहारमध्ये तरुण नेतृत्व उदयाला येत आहे. पण तिथे अपेक्षेनुसार निकाल लागले नाहीत. बिहारमध्ये भाजप विरुद्ध तेजस्वी यादव अशीच निवडणूक पाहायला मिळाली. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध पंतप्रधान, केंद्रातील अनेक मंत्री, स्थानिक राजकीय पक्ष आणि प्रशासनाची ताकद होती, अशा परिस्थितीतही तेजस्वी यादव यांनी चांगली लढत दिली”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. याशिवाय … Read more

राज्यपाल नियुक्त सदस्य निवड: ‘राज्यापालांकडे संविधानिक अधिकार, त्याचं ऐकावंच लागेल’- चंद्रकांत पाटील

पुणे । राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी १२ जणांच्या नावाची यादी लवकरच मुख्यमंत्री राज्यपालांकडे पाठवणार आहेत. याविषयी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यापालांकडे संविधानिक अधिकार आहेत त्याचं ऐकावंच लागेल’, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. राज्यपाल भाजपला झुकतं माप देतात अशी चर्चा होतेय असा … Read more