पक्षाच्या ‘त्या’ नियमाला पडळकर अपवाद का? खडसेंनाचा चंद्रकांतदादांना परखड सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी उफाळून आली आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यामागे राज्यातील भाजप नैतृत्वाचा हात असल्याचा थेट आरोप खडसे यांनी करत राज्यातील नेत्यांना धारेवर धरले होते. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत “विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर विधान परिषदेचं देत नाहीत, हा पक्षाचा नियम आहे. पंकजा मुंडेंना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. रोहिणी खडसे यांना तिकीट दिलं होतं,” अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवर आता एकनाथ खडसे यांनी तिखट प्रतिक्रिया देत त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत.

“विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर विधान परिषदेचं देत नाहीत, हा पक्षाचा नियम आहे तर मग गोपीचंद पडळकरांना का तिकीट दिलं? ते का अपवाद ठरले? चांगल्या कार्यकर्त्यांना डावलण्यासाठी सांगायला ते कारण आहे. पंकजा मुंडे यांच्याशी माझं बोलणं झालं, पण त्याबद्दल मी बोलणार नाही. हे म्हणतात सुनेला तिकीटं दिलं, मुलीला तिकीटं दिलं. आम्ही कुठे मागितलं होतं मुलीसाठी तिकीट? माझ्यासाठी तिकीट मागितलं होतं. माझी मुलगी ढसाढसा रडत होती, मला तिकीट नको म्हणून तरी तिला जबरदस्ती तिकीटं दिलं. का दिलं? मला जाणूनबुजून तिकीट नाकारलं. नाथाभाऊंसारखा स्पर्धक परत तयार व्हायला नको होता. मी सांगितलं होत, इथे मला व्यक्तिगत मानणारा वर्ग आहे, माझी मुलगी निवडून येणार नाही. तरी जबरदस्ती तिकीट दिलं,” असं सांगत एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना धारेवर धरलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”