हिंगोली प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आज पुन्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर भाष्य केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी आज प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पाटील असे का बोलले त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे जाणण्यासाठी मी त्यांना फोन केला मात्र त्यांचा फोन लागत नव्हता.
हर्षवर्धन पाटील यांनी कार्यर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना लबाडांचे काम इथून पुढे करायचे नाही. राष्ट्रवादीने आमच्या कार्यर्त्यांना आणि मला खूप त्रास दिला. मात्र इथून पुढे राष्ट्रवादीचे काम करायचे नाही असे म्हणून राष्ट्रवादीवर चांगलेच तोंडसुख घेतले. या त्यांच्या टिप्पणीवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. आपण त्याचा मेळावा झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले. कारण ते माझ्या स्वतःच्या मतदाररसंघातील आहेत. त्यानंतर त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी मी त्यांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन लागत नव्हता. त्याच्या सोबत आमचे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी आधी आमच्या सोबत बोलायला पाहिजे होते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दरम्यान सीबीआय, ईडी , बँक आणि कारखाना या बाबी मुळेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधून लोक भाजप शिवसेनेत पक्षांतर करत आहेत असे विधान देखील सुप्रिया सुळे यांनी केले आहे. याआधी देखील सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात याच आशयाचे विधान केले होते. जे लोक मला भेटून जातात ते लोक याच गोष्टी आम्हाला सांगतात की सीबीआय, ईडी , बँक आणि कारखाना या चार पैकी एका कारणामुळे आम्ही पक्षांतर करत आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.