धावत्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न आला अंगलट, पनवेल स्टेशनवरील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अति घाईमुळे आपण अनेक अपघात होताना पाहत असतो. ज्यात धावत्या ट्रेनमधून (Train) उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसोबत मोठी दुर्घटना झाल्याचे आपण पहिले असेल. यामध्ये काहीवेळा त्या व्यक्तीचा जीवसुद्धा जातो. अशीच एक घटना पनवेल रेल्वे (Train) स्थानकात घडली आहे. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हि संपूर्ण घटना कैद झाली आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
या घटनेत पनवेल स्टेशनवर एक व्यक्ती धावत्या ट्रेनमध्ये (Train) चढण्याच्या प्रयत्न करत असताना खाली कोसळते. मात्र, सुदैवाने आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे या व्यक्तीचा जीव वाचतो. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती नेत्रवती एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
नेत्रवती एक्सप्रेस पनवेल स्टेशनवरुन निघताच एक व्यक्ती भरपूर बॅग घेऊन ट्रेनमध्ये (Train) चढण्यासाठी प्लॅटफॉर्मवर धावू लागतो. थोडावेळ धावल्यानंतर तो ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ट्रेनचे स्पीड अधिक असल्याने त्याला हे शक्य होत नाही. यादरम्यान त्याचा तोल जातो आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत अडकतो. सुदैवाने जवळच उभा असलेल्या आरपीएफ जवानाने क्षणाचााही विलंब न करता धाव घेऊन त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय