मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे (train) हा देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. ह्या रेल्वेमुळे झालेल्या अपघाताचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. परंतु, अनेकदा काही प्रवासी क्षुल्लक कारणासाठी आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा काही लोक लवकर पोहोचण्याच्या नादात रेल्वे (train) ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात आणि आपला जीव गमावतात. यात काहींचा दुर्दैवी मृत्यू होतो, तर काहींचा जीव थोडक्यात वाचतो.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आपके जूते से ज्यादा आपकी जान की क़ीमत है,
जुतों का क्या है वो तो बाजार में दोबारा मिल जाएगा
पर आपकी जान दोबारा नहीं मिलेगी 🙏❤️ pic.twitter.com/u48ZhXTooN— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 14, 2022
काय आहे व्हिडिओमध्ये?
एक व्यक्ती रेल्वेच्या (train) दोन ट्रॅक्समधलं रेलिंग ओलांडून येतेय. कारण, त्याला एका प्लॅटफॉर्मवरून दुसर्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे. रेलिंग ओलांडून आल्यावर तो ट्रॅकमधून प्लॅटफॉर्मवर चढणार होता. तेवढ्यात त्याची चप्पल पायातून निघाली. त्याला दुरून ट्रेन येताना दिसली. म्हणून ती व्यक्ती चप्पल घेऊन पुन्हा ट्रॅक ओलांडून रेलिंगपाशी गेली. तिथे या व्यक्तीने चप्पल घातली; पण मग त्याला ट्रॅक क्रॉस करायची घाई झाली. कारण समोरून ट्रेन येत असतानाही तो ट्रॅक क्रॉस करत होता हि संपूर्ण घटना रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
‘जिंदगी गुलजार है’ या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘तुमचा जीव हा चपलेपेक्षा अधिक मोलाचा आहे. चपला गेल्या तर बाजारात विकत मिळतील, पण जीव नाही,’ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. रेल्वे (train) ट्रॅक क्रॉस करणं हे धोकादायक आहे अशा घोषणा रेल्वेस्थानकात नेहमीच होताना दिसतात तरीदेखील काही प्रवाशी या घोषणांकडे दुर्लक्ष करत रेल्वे क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या निष्काळजीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती