भारत, चीनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींची बैठक सुरु; भारतीय लष्करी प्रवक्ते म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | भारत आणि चीनचे अधिकारी सद्यस्थीतीत सीमावर्ती भागात लक्ष देण्यासाठी प्रस्थापित मुत्सद्दी, लष्करी माध्यमांद्वारे काम करत आहेत. या परिस्थितीत त्यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती ही अनुमानाच्या आधारे अथवा ठोस पुराव्यांशिवाय माध्यमांमध्ये देणे हे उपयुक्त नाही असे भारतीय लष्कराचे प्रवक्ते यांनी म्हंटले आहे. त्यांनी माध्यमांना अशा प्रकारच्या वृत्तांकनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) (Line of Actual Control) च्या संदर्भात गेले महिनाभर सुरु असणाऱ्या तणावाचे निराकरण करण्यासाठी आज (शनिवार) सकाळी दोन्ही देशातील उच्चस्तरीय प्रतिनिधींची बैठक सुरु झाली आहे. त्यामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

दोन्ही देशाच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वादग्रस्त हिमालयीन सीमांच्या भडकलेल्या मुद्द्यावर चर्चा केल्या. चीनच्या बाजूला असणाऱ्या चुशुल-मोल्दो या ठिकाणी या चर्चा होत आहेत. भारतीय शिष्टमंडळात १४ लष्करी तुकडीचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्यासोबत१० अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या चीनसोबतच्या बैठकीत सहभाग घेतला होता. चीनकडून दक्षिण झिन्जिआंग सैन्य विभागाच्या लष्करी तुकडीचे कमांडर लिन लिऊ, व पिपल लिबरेशन आर्मीचे अन्य १० अधिकारी या बैठकीला उस्थित आहेत. शुक्रवारी दोन्ही देशातील शांती आणि संवेदनशीलता यांचा आदर करून शांततापूर्ण मार्गातून हा वाद मिटविला पाहिजे अशी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

गेल्या महिन्यापासून भारताने लडाख मध्ये रस्तेबांधणी सुरु केल्यापासून भारत चीनच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी दोन्ही बाजूने बैठक घेण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर अद्याप तोडगा काढता आलेला नाही. दोन्ही देशातील वातावरण संवेदनशील झाले आहे. दोन्ही बाजूनी परस्पर सामंजस्याने हे मतभेद मिटावेत असे चीनच्या काही वाचकांचे म्हणणे आहे. या बैठकीतून शांततापूर्ण मार्गाने मतभेद मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment